Ticker

6/recent/ticker-posts

आरोग्यवर्धक आहार घेऊ, नियमित व्यायाम करू आणि तंंदुरुस्त राहू: केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर

ठळक मुद्दे:


अनुराग ठाकूर यांनी फिट इंडिया हेल्दी हिंदुस्तान (तंदुरुस्त भारत निरोगी हिंदुस्तान) च्या मान्यवर तज्ञांसोबत एक विशेष सत्र घेतलं. यात त्यांनी तंदुरुस्ती, आरोग्यवर्धक आहाराचा तक्ता, ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा आणि आपल्या दैनंदिन जीवनात भरडधान्याचं महत्त्व याविषयी चर्चा केली.
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी रविवार, 15 जानेवारी रोजी फिट इंडिया हेल्दी हिंदुस्तान अर्थात तंदुरुस्त भारत निरोगी हिंदुस्तान या चर्चात्मक मालिकेचा,भरड धान्यावर बेतलेल्या विशेष भागासह आरंभ केला.

मुख्य मालिकापूर्व कार्यक्रमाच्या विशेष भागात, अनुराग ठाकूर यांनी फिट इंडिया हेल्दी हिंदुस्तान (तंदुरुस्त भारत निरोगी हिंदुस्तान) च्या मान्यवर तज्ञांसोबत एक विशेष सत्र घेतलं. यात त्यांनी तंदुरुस्ती, आरोग्यवर्धक आहाराचा तक्ता, ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा आणि आपल्या दैनंदिन जीवनात भरडधान्याचं महत्त्व याविषयी चर्चा केली.

प्रख्यात तंदुरुस्ती तज्ञ आणि फिट इंडिया उपक्रमाचे मान्यवर यांचा सहभाग असलेली ऑनलाइन चर्चासत्रं दाखवणारी ही मालिका, 22 जानेवारीला सुरु होऊन 12 मार्च 2023 पर्यंत सुरू राहील आणि दर रविवारी सकाळी 11 वाजता फिट इंडियाच्या अधिकृत यू ट्युब आणि इन्स्टाग्राम हँडलवर प्रसारीत होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या