*🟣शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर कायमच कमी राहावे हीच केंद्र सरकारची भूमिका🟣*
(मागचे असो किंवा आत्ताचे महाराष्ट्रातील सरकारही कांदाप्रश्नी उदासीनच)
*भारत दिघोळे*
संस्थापक अध्यक्ष
*महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.*
फिलिपाइन्स देशात कांद्याचे प्रचंड भाव वाढले आहेत अशा बातम्या मीडियामध्ये व युट्युबवर आल्यानंतर याच बातम्या सोशल मीडियावर भरपूर फिरल्या प्रत्यक्षात फिलिपाईन्स या देशाने फक्त चीनकडून कांदा आयात केला भारताकडून नाही पाकिस्तानातही भारतीय कांदा निर्यात होत आहे परंतु तो दुबईमार्गे दुबईमध्येही कांदा आता 60 ते 65 रुपये किलो आहे देशाची राजधानी दिल्लीतही आज कांदा 25 ते 40 रुपये किलो या दराने विकला जातोय मात्र शेतकऱ्यांच्या कांद्याला महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये सरासरी 12 ते 14 रुपये प्रति किलोला दर मिळतोय
संपूर्ण भारताला दरवर्षी हवा तितका कांदा पुरवण्याची क्षमता महाराष्ट्र सह देशातील कांदा उत्पादकांची आहे परंतु सरकारने कांदा उत्पादकांना उत्पादन खर्चापेक्षा जास्त दर (किमान 30 रुपये प्रति किलो) कसा मिळेल यासाठी जास्तीत जास्त कांदा निर्यातीचे धोरण तयार करण्याची गरज आहे.
भारताला जागतिक महासत्ता व्हायचे असेल तर देशात फक्त उद्योग व्यवसाय मोठे होऊन फक्त औद्योगिक निर्यात करुन ते शक्य होणार नाही देशातून इतर वस्तूंसोबत कांद्यासह सर्वच शेतमालाची जास्तीत जास्त देशांमध्ये निर्यात झाली तरच भारत देश जागतिक महासत्ता होऊ शकतो.
*-महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.*
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro