पन्हाळे येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
काजीसांगवीः(उत्तम आवारे) पन्हाळे येथे 74 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहन कार्यक्रम मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. ध्वजाचे ध्वजारोहण अंबादास रामभाऊ आवारे यांनी केले व विद्यार्थांना भरघोस असे बक्षिस छबु तुकाराम आवारे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास सरपंच बाबुराव कुंभार्डे उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल आवारे विजय आवारे, शा.व्यवस्थापन समिती अध्यक्ष उत्तम आवारे व सर्व सदस्य , पालक , सर्व शिक्षक शिक्षण प्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांचे लेझीम चे प्रात्यक्षिक डंबेल चे प्रात्यक्षिक विविधांगी कवायत,व इतर कार्यक्रम उत्सहात घेण्यात आले .गावकऱ्यांतर्फे नवीन उपक्रम सुरुवात करण्यात आली यामध्ये दर्शनी वारी विद्यार्थ्यांना विविध खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात येणार आहे .गावातील लष्करी जवान सुजित मोठ्याभाऊ कुंभार्डे दीपक मोठेभाऊ कुंभार्डे यांच्या तर्फे शाळेत अँड्रॉइड टीव्ही भेट देण्यात आला .ग्रामस्थांनी शाळेच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro