Ticker

6/recent/ticker-posts

हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव झाल्यास या उपयोजना करून मिळवा नियंत्रण

 हरभरा पिकावर घाटे अळीचा  प्रादुर्भाव झाल्यास या उपयोजना करून मिळवा नियंत्रण
हरभरा पेरणी उशिरा झाली असल्याने त्या ठिकाणी हरभरा पिक हे कळ्या आणि फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. अशातच सध्या राज्यात बहुतांशी ठिकाणी विशेषता मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.पिकावर विशेषतः घाटे अळीचा प्रादुर्भाव हा ढगाळ हवामानामुळे होत असतो.


हरभरा पिकाचे या किडीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा खालीलप्रमाणे उपाययोजना करावी.


कीड नियंत्रणाची वेळ निश्चित करण्यासाठी आठवड्यातून एक दोन वेळेस पिकाची बारकाईने पाहणी करून पानांवर बारीक बारीक पांढरे डाग दिसून येताच अथवा पिकाच्या एक मीटर लांब ओळीत 1-2 अळ्या आढळून आल्यास अथवा 5 टक्के घाट्यावर अळीचा उपद्रव दिसून येताच एक हेक्टर क्षेत्रात 8-10 फेरोमोन (कामगंध) सापळे बांबूच्या सहाय्याने पिकाच्या उंचीपेक्षा अधिक उंचीवर अडकवून सलग 2 ते 3 दिवस प्रत्येक सापळ्यात 8-10 पतंग येत असल्यास कीटकनाशाकाची फवारणी/धुरळणी करावी.


पिक फुलोऱ्यात आणि घाटे भरताना अळीचा प्रादुर्भाव वाढल्यास शक्य झाल्यास अळ्या वेचून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट कराव्यात.


पेरणी बरोबर ज्वारीची दाणे मिसळली नसल्यास शेतात पिकाच्या उंचीपेक्षा अधिक उंच इंग्रजी (T) आकाराच्या काठ्या पक्ष्यांना बसण्यासाठी पक्षीथांबे म्हणून रोवाव्यात.


रासायनिक कीटकनाशाकांची फवारणी/धुरळणी शक्यतो पट्टा पद्धतीने पिकाच्या 1 ते 1.5 मी. रुंद एका आड एक पट्ट्यावर करावी व राहिलेल्या पट्ट्यावर 5-7 दिवसांनी परत फवारणी करावी जेणेकरून परोपजिवी/परभक्षी किडींचे संवर्धन होऊन त्यांची कीड नियंत्रणास मदत होईल.


घाटे अळीच्या नियंत्रणाकरिता त्या अळीचा विषाणू (एच.ए.एन.पी.व्ही.) प्रती हेक्टर 500 रोगग्रस्त अळ्यांचा अर्क फवारावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या