दिघवद कैलास सोनवणे चांदवड तालुक्यातील उर्धुळ येथे जि प प्राथमिक शालेत वार्षिक स्नेह संमेलन संपन्न झाले ,अध्यक्ष स्थान शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रावसाहेब नामदेव खुटे यांनी भूषवले १ली ते ४थी च्या विद्यार्थी यांनी गायन, नृत्य ,वकृत्व नाटिका सादर केल्या ,कार्यक्रम यशस्वीतेसाठी भागूबाई ठाकरे ,कविता आवारे ,संजय शिंदे,दिनेश नेरकर ,यांनी प्रयत्न केले कार्यक्रमासाठी सुमन ठाकरे, संदीप नवले ,संदिप ठाकरे,सीताराम खुटे,गणपत ठाकरे,पूनम खुटे,मंदाकिनी ठाकरे, माया खुंटे, महेंद्र हिरे,मनीषा खुटे,मोतीराम खुटे, बापू ठाकरे,तसेच शिक्षण प्रेमी नागरिक ,पालक उपस्थित होते सरपंच कविता ठाकरे उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य, व ग्रामस्थ उपस्थित होते ,कार्यक्रमाचे नियोजन व सूत्र संचलन प्रो.संदीप ठाकरे ,व देवदत्त खरड यांनी केले आभार मुख्याध्यापिका भागूबाई ठाकरे यांनी मानले पालक वर्गाचे सहकार्य लाभले
किटकनाशके
किटकनाशके कीटकनाशके व कीडनाशके : केवळ किटकांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी जी रसायने असतात, त्यांना कीटकनाशके असे म्हणतात. उदा.कार्बारील, डाय मेथोएट इत्यादी. याउलट कीडनाशके ही संज्ञा व्यापक असून, पिकावरील कोणत्याही शत्रुला मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाला कीडनाशके असे म्हणतात. किडनाशकांमध्ये किटकनाशकांचा अंतर्भाव होतो. किडनाशकांची उदाहरणे झिंक फॉस्फाईड, स्ट्रीकनीन, मेटाल्डीहाईड, केलथेन इत्यादी आहेत. किटकनाशकांची बाजारात उपलब्ध असलेली प्रारुपे : किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाचे मूलद्रव्य वापरणे योग्य व हितावह नाही, तेव्हा या क्रियाशील घटकांचे प्रमाण मोठ्या क्षेत्रावर समान प्रमाणात फवारण्यासाठी त्याची प्रारुपे मिळतात. ती प्रारुपे खालीलप्रमाणे आहेत. १) भुकटी : यात मुळविष ०.६५ ते १० टक्क्यांपर्यंत असते. अशा किटकनाशकांचा वापर जेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते, अशा ठिकाणी केला जातो. उदा. मिथील पॅराथिऑन, १० टक्के कार्बारील. २) पाण्यात विरघळणारी भुकटी : यात मुळविष ५० ते ८५ टक्केपर्यंत असते. प्रारुप पाण्यात मिसळून फवारता येते, कार्बारील ५० टक्के डब्ल्यू.डी.पी., गंधक ८० टक्के जलद्राव्य
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro