Ticker

6/recent/ticker-posts

हिवरखेडे येथील विद्यार्थिनींचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

हिवरखेडे येथील विद्यार्थिनींचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश




काजीसांगवीः चांदवड तालुक्यातील हिवरखेडे  जि. प. सेमी इंग्रजी शाळेतील हिवरखेडे येथील शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळालेली सृष्टी गोवर्धन शिंदे, समृद्धी संतोष शिंदे या पात्र ठरल्या . यशस्वी विद्यार्थिनींचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सुनील शिंदे, सदस्य संतोष शिंदे, सरपंच श्री .बिंटू भोईटे व शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी अभिनंदन केले. गटशिक्षणाधिकारी श्री. संदीपकुमार शिंदे ,शिक्षण विस्तार अधिकारी श्री .वसंतराव खैरनार यांच्या प्रेरणेतून व केंद्रप्रमुख श्री सर्जेराव ठोके यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले आहे. विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका संध्या देवरे मुख्याध्यापक राहुल कापुरे ,राजाराम गुंजाळ, कमल सूर्यवंशी, जयश्री पाटील, सुनील बच्छाव या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या