छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भगतसिंग कोशियारी यांचा पुतळ्याचे दहन
दिघवदः कैलास सोनवणे दहिवद ता चांदवड येथे भगतसिंग कोषयारी आणि सुधानशू त्रिवेदी यांनी छत्रपतींचा केलेला अवमानाच्या विरोधात संतप्त होऊन कोषयारी आणि त्रिवेदी यांच्या पुतळ्याला चपला मारून आणि पुतळा दहन करून निषेध केला प्रसंगी प्रहार जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर आणि दीपक खांदे यांनी शेतकरी आणि शेतमाल बाजार भाव हे दोघेही धुळीस मिळत असताना गप आहेत परंतु ते सगळं सहन करणारे शेतकरी छत्रपतींचा अवमान सहन करणार नाही गावखेड्यातला सगळा तरुण रस्त्यावर आल्याखेरीज राहणार नाही .जर कोषयारी आणि त्रिवेदी यांना महाराष्ट्र बंदी केली नाही तर सगळ्यांना त्यातून त्रास होईल किंवा महाराष्ट्रात आगडोंब उसळेल त्यातून स्वारण कठीण होईल
राज्यपालाने शेतकरी,नुकसानभरपाई,बाजारभाव या संदर्भात असलेल्या पदाच्या माध्यमातून लोकांना न्याय द्यावा ना की हे असले उद्योग करावे यात सुधारणा व्हावी आणि त्या दोघांना शिक्षा व्हावी अन्यथा अनर्थ निश्चित असे म्हणाले यावेळीमाजी सरपंच नामदेव वाघमोडे ,एकनाथ झुरळे ,तुकाराम निंबाळकर,दीपक खांदे ,संदीप वाघमोडे तंटामुक्ती अध्यक्ष संजय निंबाळकर, नामदव निंबाळकर किशोर बोरसे ,अक्षय गांगुर्डे, पुंडलिक गांगुर्डे कल्पेश म्हणाले
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro