प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांनी गिरविले व्यवहार ज्ञानाचे धडे.
काजी सांगवी:- चांदवड तालुक्यातील हिवरखेडे येथे जि प सेमी इंग्रजी शाळा हिवरखेडे येथे
शिक्षणातून साक्षरते बरोबर प्रत्यक्ष कृतीतून उत्पादनक्षम शिक्षण व व्यवसायभिमुकता हे उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून दप्तर मुक्त शनिवार अंतर्गत आज विद्यार्थ्यांनी छोटासा भाजीपाला बाजार भरवत गणन, बेरीज ,वजाबाकी व व्यवहारज्ञान या सर्व बाबींचा प्रत्यक्ष कृतीतून अनुभव घेतला.
सदर कार्यक्रमाचे सरस्वती पूजन माणिक पंढरीनाथ भोईटे यांच्या हस्ते तर भाजी बाजाराचे उद्घघाटन पोलीस पाटील अनिता संदीप जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील शिंदे उपाध्यक्ष पोपट शिंदे, सरपंच बिंदू भोयटे सदस्य संतोष शिंदे ,सुरेखा शिंदे ,बाबू कादरी
कारभारी शिंदे, वर्षा बोरा ,भारती शिंदे निर्मला शिंदे ,सुनंदा शिंदे मधुकर वाळुंज व डॉक्टर सोनवणे मॅडम तसेच मोठ्या संख्येने पालक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते .
सदर उपक्रम गटशिक्षणाधिकारी श्री . संदीपकुमार शिंदे. विस्तारआधिकारी श्री. वसंतराव खैरनार. केंद्रप्रमुख श्री . सर्जेराव ठोके यांच्या प्रेरणेतून मुख्याध्यापक राहूल कापूरे व शिक्षक राजाराम गुंजाळ , कमल सूर्यवंशी ,संध्या देवरे ,जयश्री पाटील ,सुनील बच्छाव यांनी यशस्वी पणे पार पाडला .
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro