नत्र (नायट्रोजन)चे कार्य
- नत्र हे पिकातील हरितलवकचा घटक आहे.
- नत्र हे जीवानाच्या मुलभुत अशा डी.एन.ए. आणि आर.एन.ए. चा मुलभुत घटक आहे.
- प्रथिनांचा मुलभुत घटक
यामुळे ज्यावेळेस भरपुर शाकिय वाढ, भरपुर उत्पादन (कडध्यान्ये, तेलबिया) मिळत असते त्यावेळेस भरपुर प्रमाणात नत्राचे शोषण पिकाकडुन झालेले असते. मात्र अति प्रमाणातील नत्राच्या शोषणाने उत्पादनाचा कार्बन-नायट्रोजन गुणोत्तर बिघडुन इतर काही तोटे देखिल होतात.
*नत्राचा -हास -*
सन १९८० साली अग्रीको केमिकल कंपनीच्या शेती तज्ञांनी पिकास दिलेल्या नत्राच्या विविध स्वरुपांचा अभ्यास केला, तसेच इतर माहीती जमा करुन, त्यांनी खालिल प्रमाणे काही ठोकताळे मांडलेत. जरी हि माहीती १०० टक्के परिपुर्ण आणि सर्व समावेशक नसली तरी यातुन हे मात्र नक्कि होते कि, पिकास दिलेला नत्र ज्या विविध प्रकारे वाया जातो त्याबाबत काही मार्गदर्शक माहीती मिळेल.
*पिकाकडुन शोषीत झालेला नत्र 40 % - 70% -*
*नत्र वाया जाण्याचे मार्ग -- नत्राचे स्वरुप -- टक्केवारी*
स्थिरीकरण (इंमोबीलायझेशन) -- अमोनिकल, नायट्रेट -- 10-40%
झिज (इरोजन) -- अमोनिकल -- 0-20%
डि-नायट्रेफिकेशन -- नायट्रेट -- 5-35%
जमिनीत वाहुन जाणे (लिचिंग) -- नायट्रेट -- 0-20%
अमोनिकल व्होलाटायझेशन -- युरिया -- 0-30%
इंमोबीलायझेशन म्हणजे जमिनीत असलेल्या विविध सुक्ष्मजीवाणुंकडुन ज्यात प्रामुख्याने बॅक्टेरियाचा समावेश होतो त्यांच्या कडुन वाढीसाठी नत्राचा वापर असे होय. ही क्रीया फार कमी कालावधीसाठी घडत असते, सुक्ष्मजीवाणुंच्या मृत्यु नंतर त्यांनी शोषलेला नत्र पिकांस त्वरीत उपलब्ध होत असतो.
इरोजन म्हणजे मातीच्या कणांना (सी.ई.सी.कॉम्प्लेक्स) चिकटेले नत्राचे कण माती सोबत वाहुन जातात.
उबदार हवामानात जमीनीत पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यावर (सॅच्युरेशन - अशी अवस्था ज्यात मर्यादेपेक्षा जास्त पाणी झाल्यास वाहायला सुरुवात होईल) जमिनीतील ऑक्शिजन चे प्रमाण कमी होते, जे असते ते जमिनीतील सुक्ष्मजीव वापरित असतात, अशा वेळेस नत्र हवेत उडुन जातो.
थंडीच्या काळात जमिनीत जास्त प्रमाणात पाणी झाल्यास कशा प्रकारे नत्राचे डी-नायट्रीफीकेशन होते ते या ठीकाणी दिलेले आहे.
*जमिनीचे तापमान (अंश सेल्सियस) -- किती दिवस सतत पाणी जास्त झाले -- डी-नायट्रीफिकेशन (टक्के)*
12.7 - 15.5 -- 5 दिवस -- 10%
10 दिवस -- 25%
23.8 - 26.6 -- 3 दिवस -- 60%
5 दिवस -- 75%
7 दिवस -- 85%
9 दिवस -- 95%
त्यामुळे पिकास थंडीच्या काळात टप्याटप्यात कमी नत्र सतत द्यावा.
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro