Ticker

6/recent/ticker-posts

केळी

केळी

जमीन: काळी कसदार, भुसभुशीत, गाळाची पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ असावा. 
जाती: बसराई, अर्धापूरी श्रीमती व ग्रेड- फुले इत्यादी

अभिवृद्धी : मुनये किंवा कंद किया ग. ५०० ते ७५० ग्रॅम वजनाने नारळाच्या आकाराचे सरळसोट तलवारीच्या पाने असलेले मुनवे सुमारे २ ते ३ महिन्याचे निवडावेत किंवा उतीसंवर्धीत केळी रोपाची लागवड करावी.

लागवड: १५ X १.५ मीटर अंतरावर जून-जुलैत लागवड करावी (हेक्टरी ४०४४ झाडे) सिंचनाची व्यवस्था असल्यास (देव) ऑक्टोबर महिन्यात लागवड करावी.  हवामान :समशितोष्ण प्रदेश व कमी वारा मानवतो.
पाणी पुरवठा : ४५ ते ६० पाण्याच्या पाळ्या आवश्यक आहे चाचा उपयोग केल्यास ३० ते ४० टक्के पाण्याची बचत होते. 
निगा : मातीची भर देणे, पिलं कापणे (पंधरा दिवसाचे अंतराने) खोडाला व घढाला कैची (आधार) देणे, बागेभोवती वारा प्रतिबंधक वृक्षाची (शेवरी, मलबेरी) रांग लावणे घडाभोवती पाने गुडाळणे थंडीपासून बागेचे संरक्षण करणे करीता शेकोट्या पेटविणे, रात्री पाणी देणे) पालाश खतांचा वापर करावा व नत्र खतांचा वापर टाळावा. बागेला झिंक व फेरस सल्फेट १० ग्रॅम प्रति झाड द्यावे पोंगासह होत असल्यास कॉपर ऑक्सीक्लोराईड ३० ग्रॅम + क्लोरोपायरीफॉस ३० मि.ली. १० लिटर पाण्यात फवारणी करावी इत्यादी निगा घेणे आवश्यक आहे. 

फुलोन्याची वेळ : एप्रिल-ऑगस्ट,

फळे तोडणीचा हंगाम : जुलै ते जानेवारी, केळीला फूल आल्यानंतर सुमारे १०० ते १२० दिवसात घड कापणीस योग्य होतो .
उत्पादन : १५ ते २५ किलोचा घड प्रति झाडापासून हेक्टरी ४० ते ५० मे टन 

आर्थिक आयुष्य १४ ते २० महिने

उतीसंवर्धन केळी रोपांची निवड व निकष : 
● उतीसंवर्धन रोपे तयार करण्यासाठी योग्य आणि स्वतंत्र मातृवृक्ष रोपवाटिकेचे क्षेत्र असावे त्यावर सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजलेले असावेत

• या मातृवृक्ष रोपवाटिकेमधील बागेतील निरोगी, सशक्त, प्रचलीत जातीचे सर्व गुणधर्म असणारी आणि ३० किलोग्रॅम

पेक्षा जास्त वजनाचा घड असलेल्या झाडाचेच मुनवे वापरलेले असावेत मुनवे वापरण्याआधी त्याचे व्हायरस इन्डेक्सींग केलेले असावे तसेच बुरशी व जिवाणूजन्य रोगापासून मुक्त असे वेणे घ्यावे.

उतीसंवर्धत रोपांची प्राथमिक हार्डनिंग ४५ दिवस ग्रीन हाऊसमध्ये आणि व्दितीय हार्डनिंग ४५ दिवस शेडनेटमध्ये झालेली असावी. रोपे १५ ते २० सें.मी. आकाराच्या प्लास्टिक बॅगमध्ये विशिष्ट खत घालून लावलेली असावी.

.साधारण ४ ते ५ पानांची ३० ते ४० सें.मी. उंचीची असलेली पूर्णपणे ३ महिने हार्डनिंग झालेली सशक्त रोपेच लागवडीसाठी वापरावीत.

केळीचे उतीसंवर्धीत रोपे ३ ते ४ महिने प्रस्थापित केलेली असावी.

कमी अथवा जास्त वयाच्या रोपांची निवड करू नये.

• रोपांची उंची ४५ ते ५० सें.मी. असावी.

रोपांच्या बुंध्याचा घेर ५.५ ते ७.० सें.मी. असावा.

रोपांच्या पानांची संख्या ६ ते ९ असावी.

• रोपांची पाने वेणी सारखी जवळ-जवळ असू नये.

धन्यवाद
🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या