Ticker

6/recent/ticker-posts

डाळींब लागवड व तंत्रज्ञान

डाळींब लागवड व तंत्रज्ञान

हवामान : डाळिंबाचे पिकास कोरडे हवामान उपयुक्त आहे. उन्हाळयातील कडक ऊन व कोरडी हवा तसेच हिवाळयातील कडक थंडी डाळिंबाच्या वाढीस योग्य असते. अशा हवामानात चांगल्या प्रतीची फळे तयार होतात परंतु अशा प्रकारच्या हवामानात जरी थोडा फार फरक झाला तरी सुध्दा डाळिंबाचे उत्पन्न चांगले येते. फुले लागल्यापासून फळे तयार होईपर्यंतच्या काळात भरपूर ऊन व कोरडे हवामान असल्यास चांगल्या प्रकारची गोड फळे तयार होतात. कमी पावसाच्या प्रदेशात जेथे थोडीफार ओलिताची सोय आहे तेथे डाळिंबाच्या लागवडीस भरपूर वाव आहे.

जमीन : डाळिंबाचे पीक कोणत्याही जमिनीत घेण्यात येते. अगदी निकस, निकृष्ठ जमिनीपासून भारी, मध्यम काळी व सुपीक जमीन डाळिंबाच्या लागवडीसाठी चांगली असते. मात्र पाण्याचा चांगला निचरा होणारी गाळाची किंवा पोयटयांची जमीन निवडल्यास उत्पन्न चांगले मिळते. त्याचप्रमाणे हलक्या, मुरमाड, माळरान किंवा डोंगर उताराच्या जमिनीसुध्दा या पिकाला चालतात. मात्र जमिनीत पाण्याचा निचरा होणे आवश्यक आहे. डाळींबाचे पीक जमीन व हवामानास संवेदनशिल आहे. भारी ते अतिशय भारी जमिनी, पानथळ व खोलगट जमिनी, आर्द्रता असणाऱ्या भागांमध्ये डाळींबाची लागवड करू नये.

जाती : सर्वसाधारण लागवडीसाठी पुढील जाती योग्य समजल्या जातात. भगवा, सुपर भगवा, मृदुला, आरक्ता, गणेश, मस्कत, ज्योती, रूबी.

अभिवृध्दी : जातीवंत झाडाकरीता डाळींबाची अभिवृध्दी गुटी कलम किंवा छाटे कलम पध्दतीने करतात. छाटे कलम करतांना छाट व त्यांचा खालील भाग आय.बी.ए. (इंडोल ब्युटिरीक अॅसिड) च्या लॅनोलीन पेस्टमध्ये पंचविसशे दशलक्ष

बहार धरणे : डाळिंबाच्या झाडास मुख्यत्वे तीन बहार येतात. आंबिया बहार, मृग बहार, हस्तबहार यापैकी कोणत्याही एका बहराची फळे घेणे फायदेशीर असते. हस्त किंवा आंबिया बहार धरणे अधिक चांगले कारण फळांची वाढ होतांना व फ तयार होताना हवा उष्ण व कोरडी राहते. त्यामुळे फळास गोडी येते.

फळांची तोडणी : डाळिंबाचे फळ तयार होण्यास फुले लागण्यापासून साधारणतः ६ महिने लागतात. आंबिया बहाराची फळे. जून ते ऑगस्ट मध्ये मृगबहाराची फळे नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये आणि हस्तबहाराची फळे फेब्रुवारी ते एप्रिल मध्ये तयार होतात. फळांची साल पिवळसर करड्या रंगाची झाली म्हणजे फळ तयार झाले असे समजावे  फळाची तोडणी करावी.
धन्यवाद
🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या