Ticker

6/recent/ticker-posts

रायपूर येथे विशेष राष्ट्रीय हिवाळी शिबिर संपन्न

रायपूर येथे विशेष राष्ट्रीय हिवाळी शिबिर संपन्न



काजीसांगवीः (उत्तम आवारे)

कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव ता.निफाड जि.नाशिक व विश्वलता कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय भाटगाव ता.येवला जि.नाशिक व ग्रामपंचायत रायपूर ता.चांदवड यांच्या संयुक्त विद्यमानाने रायपूर येथे संपन्न होत असलेल्या 'राष्ट्रीय सेवा योजनेच्या' विशेष हिवाळी शिबिरात शिवव्याख्याते प्रविण वाटोडे यांचे व्याख्यान कार्यक्रम संपन्न झाला. सदर व्याख्यानाचा कार्यक्रमासाठी मित्रवर्य,आदर्श व्यक्तिमत्व,गावच्या विकासासाठी सतत तळमळ असणारे,आपल्या कर्तुत्वातून बेलाग व्यक्तिमत्व घडवणारे,आदर्श सरपंच, आदरणीय प्रदीपकुमार गुंजाळ सरांमुळे अगदी वेळेवर हा योग घडून आला.नव्हे तर तो गुंजाळ साहेबांनी आग्रह पूर्वक घडवून आणला.दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापकांनी मुलांना घडविण्यासाठी,त्यांचं व्यक्तिमत्त्व वृद्धिंगत करण्यासाठी कामात अक्षरशः झोकून दिलेले जाणवले.त्यांची तळमळ जाणवत होती.विद्यार्थ्यांनी देखील व्याख्यानास अप्रतिम प्रतिसाद दिला.घनदाट जंगलाच्या काळयाकुट्ट अंधारातून बाहेर पडण्यासाठी एका साध्या काजव्याचा प्रकाश पुरेशा असतो,त्या प्रमाणेच या शिबिरातून एक संस्कारमय प्रकाश सोबत घेवून जावून सर्व विद्यार्थ्यांनी आपले जीवन सूर्यासारखे तेजोमय करावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या