*वाहेगाव साळ ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पदी संदीप पवार यांची बिनविरोध निवड
काजीसांगवीः उत्तम आवारे वाहेगाव साळ ग्रामपंचायत सरपंच पदाचा केशव खैरे यांनी राजीनामा दिल्यानंतर पद रिक्त झाले होते नंतर संदीप पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या सरपंच पदाची निवडणुकीची धुरा निवडणूक अधिकारी म्हणून प्रविण प्रसाद यांच्या अधिकाराखाली पार पडली. या सरपंच पदाच्या निवडी नंतर नव निर्वाचित सरपंच पवार यांनी शासनाच्या नवं नवीन योजना गावाच्या तळा गाळापर्यंत पोचवण्यात येईल व सर्व सामान्यांना प्रत्येक योजनेचा लाभ कसा होईल याचा प्रयत्न करील,अशी ग्वाही दिली व घर पट्टी -पाणी पट्टी कर भरून ग्रामपंचायत ला सहकार्य करावे असे बोलून सर्व ग्रामस्थांचे ग्रामपंचायत कराकडे व ग्रामपंचायत उत्पन्नाकडे लक्ष वेधले.
या प्रसंगी ग्रामपंचायत सर्व सदस्य,वाहेगाव साळ वि वि का सह सो ली चे सर्व चेअरमन व सदस्य,सर्व ग्रामस्थ आणि गावातील सर्व तरुण वर्ग उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro