Ticker

6/recent/ticker-posts

ज्वारीचे लागवड तंत्र

ज्वारी

ज्वारी हे विदर्भातील असमान्याचे प्रमुख पीक असून त्याची लागवड मुख्यतः मान्यव शिफारशिताचा वापर केल्यास उत्पादनक खरीप ज्वारीचे लागवड तंत्र
जमीन व पूर्वमशागत : खरीप ज्वारी ही मुख्यत्वे करून कोरडवाहू पीक म्हणून जाते. त्यासाठी मध्यम ख भारी व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. उन्हाळ्यात या ३ ते ४ खोपाळ्या देऊन जमिनीची
चांगली पूर्वमशागत करावी

भरखते : खरीप ज्वारीला हेक्टरी १०-१५ या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे व नंतर ख देऊन जमिनीत चांगले
रासायनिक खते : खरीप ज्वारी रासायनिक खताला उत्तम प्रतिसाद देते. त्यामुळे ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद ४० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. ४० किलो नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश (२०० किलो सुफला २०-२०० ६७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश अथवा ८७ किलो युरिया २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट ६७ किलो म्युरेट ऑफ पोर्ट) पेरणीसोब बावलेल्या ४० किलो नत्राची मात्रा (८७ किलो गुरिया) ज्वारीचे पीक २५ ते ३० दिवस असतांना द्यावा. रा देताना जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून प्यावी. जमिनीत उपलब्ध पालाशचे प्रमाण जास्त असेल तर पालाशची मात्रा देणे

पेरणीची वेळ : रोप ज्वारीची पेरणी साधारणतः पुरेसा पाऊस झाल्यानंतर तसेच जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यास १५ जून ते उशिरात उशिरा १० जुलै दरम्यान करावी. पेरणीस उशीर झाला तर मुरमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे झाडाची योग्ती संख्या मिळत नाही.

बिपाण्याचे प्रमाण   खरीप ज्वारीसाठी हेक्टरी ७.५ ते १० किलो बियाणे पुरेसे आहे. पेरणीसाठी दोन चा
तिफणीचा उपयोग करावा, जेणे करून पेरणीसोबतच खते देणे सोईचे होईल.

विरळणी : पेरणीपासून १२ ते १५ दिवसानी विरळणी करावी. त्यासाठी दोन झाडातील अंतर १० ते १२ से.मी. इतके ठेवावे व हेक्टरी झाडांची संख्या १.८० लाखापर्यंत ठेवावी.

ओलीत व्यवस्थापन : खरीप ज्वारी हे कोडवाहू पीक असल्यामुळे ओलिताची गरज भासत नाही. परंतु पावसाचा खंड पडून पिकाला ताण असल्यास व ओलिताची सोय उपलब्ध असल्यास एखादे संरक्षक ओलीत द्यावे.

आंतरमशागत: खरीप ज्वारीच्या उत्पादन वाढीस आंतरमशागतीचे फार महत्व आहे. ज्वारीचे पीक ४० दिवसाचे होईपर्यंत २३वा कराव्यात तणांचा जास्त प्रादुर्भाव असल्यास आवश्यकतेनुसार निंदण करावे.

 कापणी व  मळणी: खरीप ज्वारी परीपक्व झाल्यावर ताबडतोब कापणी करावी. जेणे करून ज्वारी उशिरा सामुळे होणार नाही. ज्वारी साठवणुकीच्या वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १० ते १२ टक्के पेक्षा जास्त असू नये.

वाणी ज्वारीचा वाण : 
पीकेव्ही अश्विनी (वाणी ११/६): हा वाण प्रचलित मलकापूर वाणीपेक्षा १० ते १२ दिवसांनी लवकर येणारा असून ८२ ते ८४ दिवसात याचा हुरडा तयार होतो. या वाणाचे हुरड्याचे उत्पन्न ४२ ते ४३ क्विंटल प्रति हेक्टर एवढे असून या वाणाच्या हुरड्यामध्ये शर्करेचे प्रमाण मलकापूर वाणीपेक्षा जास्त असल्यामुळे या वाणाचा हुरडा अधिक गोड व चवदार आहे. सदर वाणाचा हुरडा मळणीस सुलभ असून लवकर येत असल्यामुळे मीज माशीस तो बळी पडत नाही. 

पीडीकेव्ही हुरडा कार्तीकी - (वाणी १०३): हा वाण प्रचलित मलकापूर वाणी पेक्षा १० ते ११ दिवसांनी लवकर येणारा असून ८३ ते ८५ दिवसात याचा हुरडा तयार होतो. या वाणाचे हुरड्याचे उत्पन्न ४३ ते ४५ क्विंटल प्रति हेक्टर एवढे असून या वाणाच्या हुरड्यामध्ये शर्करेचे प्रमाण मलकापूर वाणी पेक्षा जास्त असल्यामुळे या वाणाचा हुरडा अधिक गोड व चवदार आहे. सदर वाणाचा हुरडा मळणीस सुलभ असून लवकर येत असल्यामुळे मीज माशीच तो बळी पडत नाही.

 गोड ज्वारीचा वाण : एकेएसएसव्ही- २२ : हा खरीपातील गोड ज्वारीचा वाण सध्याच्या इतर प्रचलित गोड वाणाच्या तुलनेत ८ ते १० दिवसांनी लवकर म्हणजे ११५ ते १२० दिवसात तयार होतो. धान्याचे हेक्टरी उत्पादन १३ ते १४ क्विंटल असून धांड्यापासून रसाचे हेक्टरी उत्पन्न ११ ते १२ हजार लिटर एवढे मिळू शकते. 

धांड्याचे उत्पन्न ४०० ते ४१० क्विंटल प्रति हेक्टर इतके आहे. रसातील एकूण शर्करेचे प्रमाण ११.५ ते १२ पांड्याच्या रसापासून १४५० ते १५०० लि./हे. व दाण्यापासून १८५० ते १८०० लि./हे. अल्कोहोल मिळू शकते मे खोडकिडीला हा वाण बऱ्याच अंशी प्रतिकारक्षम असा आहे.

वैरण ज्वारी वाण : सुधारित रामकेळ सुधारित रामकेळ हा वैरण ज्वारीचा वाण एकेरी कापणीस योग्य असुन उन्हाळी हंगामात पेरणीस उपयुक्त आहे. या वाणाचे हिरव्या वैरणाचे उत्पादन ४०० ५०० किंटल प्रती हेक्टर आहे. बिजोत्पादन घेतल्यास धान्याचे उत्पादन हेक्टरी २५-२८ क्विंटल व कडब्याचे उत्पादन १५०-१६० किल मिळते. 


नविन प्रसारीत वाण एस.पी.एच. १६३५ एस.पी.एच. १६३५ हा वाण एकेएमएस ३० ए मादी वाण व एकेआर या नर वाणाच्या संकरातून निर्माण करण्यात आला आहे. हा वाण खरीप हंगामात ११०-११५ दिवसात परिपक्व ह अधिक धान्य व अधिक कडबा असे दुहेरी उदिष्ट साध्य करणारा हा वाण आहे. या संकरीत वाणापासून ४८ ते ५० स्टल धान्याचे व १२० ते १२५ क्विंटल कडव्याचे उत्पादन मिळते. या वाणाची वैरणीची व धान्याची प्रत उत्तम आहे. 

पीडीकेव्ही कल्याणी : हा खरीप सरळ वाण महाराष्ट्रासाठी २०१६ मध्ये प्रसारीत करण्यात आला. हा वाण ११५-१ दिवसात परिपक्व होतो. या वाणाच्या धान्याची प्रत चांगली असून कडब्याचे ही उत्पादन अधिक देणारा वाण आहे. वाणापासून ३५ ते ४० क्विटल /हेक्टर धान्याचे व १४० ते १४५ क्विटल/हेक्टर उत्पादन मिळते. हा वाण मुख्य किर रोगांना सहनशील आहे. -

नविन प्रसारीत वाण: सी.एस.व्ही. ३४ : राष्ट्रीय स्तरावरील खरीप सरळ वाण २०१७ मध्ये प्रसारीत करण्यात आ असून हा वाण ११० ते ११२ दिवसात परिपक्व होतो. या वाणाच्या धान्याची प्रत चांगली असून कडबा उत्पादन सुध्दा अधिक मिळते. या सरळ वाणापासून ३८ ते ४० क्विटल/है. धान्याचे व १३५ ते १३८ क्विंटल/हे. कडब्याचे उत्पादन मिळते. तसेच मुख्य किडी व रोगांना बऱ्याच अंशी प्रतिकारक्षम असा आहे.


धन्यवाद
🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या