Ticker

6/recent/ticker-posts

वांगी लागवड व व्यवस्थापन

वांगी
जमीन मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन (१) मे-जून (२) ऑगस्ट-सप्टेंबर ((३) डिसेंबर-जानेवारी अ) लागवडीची पदावर रोपे तयार करून ४-५ आठवडयाची रोपे स्थलांतरित करावी

हेक्टरी बियाणे (७०० ते १००० ग्रॅम बीज प्रक्रियामा २ ग्रॅम कार्बन्डाझिम प्रति किलो बियाण्यास लावावे पूर्वमशागत : शेताची आडवी उभी नांगरणी करून नंतर ढेकळे फोडून वखरणी करावी. जमिनीमध्ये चांगले कुजलेले हेक्टरी ३०-४० फेकून खराची पाळी द्यावी

सुधारित जाती अरुणा, जेकेएलबी-१, (डॉ. पं.दे.कृ.वि विकसीत) मांजरी गोटा, पुसा पर्पल राऊंड, पुसा पल क्लस्टर, रूचिरा, प्रगती, पुसा पर्पल लॉग, पुसा जातो. फुले हरित आणि कृष्णा (संकरित वाण), फुले अर्जुन (संकरित वाण)

लागवड : सुधारित वाणाची रोप सरी- वरख्याचे वाफ्यामध्ये ७५ x ६० से.मी. किंवा ७५ x ७५ सें.मी. आणि संकरित वाणाची रोपे ९० x ७५ से. मी. अंतरावर स्थलांतरित करावी. खत व्यवस्थापन - हेक्टरी १०० किलो नत्र. ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश द्यावा. त्यापैकी अर्धा नत्र व पूर्ण स्फुरद व पालाश लागवडी सोबत द्याये राहिलेला अर्धा नत्र लागवडीनंतर ३० दिवसांनी द्यावा.

ओलीत पिकाच्या गरजेनुसार १०-१२ दिवसानी पाण्याच्या पाळ्या द्याव्या. उन्हाळ्यात पाण्याच्या पाळ्या ४-५ दिवसानी द्याव्या जमिनीच्या मगदुराप्रमाणे हा कालावधी कमी-जास्त करावा.

आंतरमशागत : पीक निरोगी व स्वच्छ राहण्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदणीकरून जमीन तणविरहीत ठेवावी

पिकाचा कालावधी : पीक बी पेरणी पासून ५० ते ६० दिवसात फुलोऱ्यावर येते व प्रथम काढणीस ७०-८० दिवसात तयार होते. या पिकाचा कालावधी २०० दिवसापर्यंत असतो. विविध जातीनुसार हा कालावधी कमी जास्त राहू शकतो. काढणी : पीक काढणीस तयार झाल्यावर दर ६-८ दिवसानी फळांची तोडणी करावी. अशाप्रकारे साधारणपणे १०-१२ तोडे मिळतात.

हेक्टरी उत्पादन साधारणपणे हेक्टरी २५० ते ३०० किंटल उत्पादन मिळते. संकरीत जातीमध्ये हेक्टरी उत्पन्न ४०० ते ४५० क्विंटल मिळते.

धन्यवाद
🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या