Ticker

6/recent/ticker-posts

महामंडलेश्वर मुक्तानंदगिरी महाराजाच्या जगन्नाथ पुरी येथे उपवास व्रताची सांगता

महामंडलेश्वर मुक्तानंदगिरी महाराजाच्या जगन्नाथ पुरी येथे उपवास व्रताची सांगता



काजीसांगवी (उत्तम आवारे)

:-जनार्दन स्वामींचे एकमात्र आंतरराष्ट्रीय शिष्य म्हणून ओळखले जाणारे विष्यवक्ता महामंडलेश्र्वर मुक्तानंद गिरि बापुजी यांच्या 21 वर्ष उपवास व्रताचे समापन दि. 9 रोजी जगन्नाथ पुरी येथे होत आहे  त्यासाठी महाराष्ट्र तील हजोरो भाविक भक्त  या कार्यक्रम साठी जाणार आहे त्यासाठी भाविकानी दहा लक्झरी बसेस ,कार, दोन रेल्वेे बोगी ची बुकिंग करुन  दि6रोजी जगन्नाथपुरी जाणार आहे. मुक्तानंदगिरी महाराजाचे औरंगाबाद जिल्हात जुनपाणी व मुंगसापुर येथे आश्रम आहे त्यांची जिल्हातील सर्वात मोठी गोशाळा असुन त्यांनी 300 अधिक गोपालन आहे. आश्रम परिसरात औषधी वनस्पतीसह हजारो वृक्ष लागवड केली आहे. तसेच बापुजीनी ची निस्वार्थ जनसेवचे व्रत आजही चालु असुन 70हजाराहुन रुग्ण गोमृत्र व नै सर्गिक उपचारांनी नि:शुल्क ठीक केले आहे. त्यांची हि सेवा कोरोना काळातही चालुच होती .बहुतांशी कोरोना रुग्णावरही उपचार केले. 

महाराज 6 देशात सनातन धर्माचा व जनार्दन स्वामीचा प्रचार करून आलेले आहेत.21 वर्ष भोजन न करता केवळ फलहार घेतला आहे .या उपवासाची सांगता जगन्नाथ पुरी येथे दि9रोजी   करणार असुन जगन्नाथाचा प्रसाद म्हणून    पवित्र भाताचा एक घास सेवन करून ते आपले व्रत सोडणार आहेत.त्यानिमित्त पुरीला 9 तारखेला सकाळी 11 ते 2 या वेळेत हजोरो भाविकाच्या उपस्थित भव्य दिव्य सत्संग ही होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या