जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पन्हाळे ता . चांदवड येथे विद्यार्थ्यांना राजगिरा लाडूंचे वाटप
काजीसांगवीःउत्तम आवारे
जिल्हा परिषद प्राथमिक पन्हाळे येथील विद्यार्थ्यांना श्री खंडू लक्ष्मण आवारे यांच्यातर्फे राजगिरा लाडूंच्या पाकीटांचे वाटप करण्यात आले .विद्यार्थ्यांना प्रत्येक शनिवारी दूध , राजगिरा लाडू किंवा केळी अशा खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात येणार आहे .या नावीन्यपूर्ण आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या उपक्रमाची सुरुवात गावातील ग्रामपंचायतचे सदस्य विठ्ठल आवारे यांनी विद्यार्थ्यांना दूध वाटप करून केली होती .यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी , तंटा मुक्ती समिती अध्यक्ष गावातील बहुसंख्य शिक्षण प्रेमी नागरिक शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी , शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते .सर्वांनी उपक्रमाचे कौतुक केले .विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे या हेतूने हा उपक्रम सुरू आहे . सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले .
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro