खानदेशात तुरीला ७५०० रुपये दर
जळगाव : खानदेशात तूर आवक बाजारात घटली आहे. सध्या कमाल दर ७५०० रुपये प्रति क्विंटल मिळत आहे. कमी लागवड व चांगली मागणी यामुळे दर टिकून आहेत.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, रावेर, मुक्ताईनगर व पाचोरा येथील बाजारात तुरीची आवक होते. धुळ्यात दोंडाईचा (ता. शिंदखेडा) आणि नंदुरबारात नंदुरबार बाजार समितीत तुरीची आवक होते. परंतु या सर्वच इ बाजारांत यंदा आवक कमी राहिली आहे.
मागील १० ते १२ दिवसांत आवक व आणखी घटली आहे. जळगाव जिल्ह्यातील त प्रमुख बाजार समित्यांत मिळून मागील १० दिवसांत प्रतिदिन सरासरी १०० क्विंटल तुरीची आवक झाली. जळगाव, चोपडा, यावल, जामनेर येथील बाजारांत तुरीची
आवकच मागील आठ ते १० दिवसांत झालेली नसल्याची माहिती आहे. धुळ्यातील दोंडाईचा येथील बाजारातही आठवड्यातून दोन-तीन वेळेस तुरीची आवक झाली. तीदेखील प्रतिदिन सरासरी ५० क्विंटल राहिली. नंदुरबारमधील बाजारातही मागील पंधरवड्यात तुरीची आवक अल्पच राहिली.
दोन हजार हेक्टरवर लागवड खानदेशात तूर लागवड कमी झाली
होती. ती सर्वत्र मिळून सुमारे दोन हजार हेक्टर होती. जळगावात फक्त रावेर, मुक्ताईनगर, बोदवड व चाळीसगाव भागात काही शेतकऱ्यांनी मुख्य पीक म्हणून तूर लागवड केली होती. कमाल कापूस उत्पादकांनी आपल्या कुटुंबापुरती तूर लागवड कापसात आंतरपीक म्हणून केली होती. अनेक शेतकऱ्यांनी गावातच तुरीची विक्री केली. यामुळे बाजारात आवक अल्प राहिली.
देशी तुरीला आठ हजारांपर्यंत दर
देशी तुरीला चांगली मागणी आहे. अनेक खरेदीदार, किरकोळ विक्रेते थेट शेतकऱ्यांकडून शिवार खरेदी किंवा खेडा खरेदीत तूर घेत आहेत. प्रति क्विंटल ७५०० रुपये दर आहे. गडद तपकीरी रंगाच्या व लहान आकाराच्या देशी तुरीचे दर आठ हजार रुपयांपर्यंत आहेत. तूर दर मागील महिन्यात साडेसहा ते सात हजार २०० रुपये होते. परंतु सध्या साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.
धन्यवाद
🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro