बोराळे ग्रामपंचायतीच्या कंत्राटी ग्रामसेवकासह सरपंचाला १५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
कैलास सोनवणे(पत्रकार दिघवद) :चांदवड तालुक्यातील बोराळे ग्राम पंचायतीच्या कंत्राटी ग्रामसेवकासह सरपंचाने लोखंडी जिन्याच्या कामाचे पैसे देण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपये प्रत्येकी लाच मागितली. ही लाच स्विकारताना या कंत्राटी ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ बेड्या घातल्या.
६२ वर्षीय पुरुष तक्रारदाराने चांदवड तालुक्यातील बोराळे ग्रामपंचायतीच्या लोखंडी जिन्याचे काम ५० हजार रुपयांत घेत ले होते.या कामाच्या बदलत त्यांना वीस हजार रुपये अपेक्षित होते, मात्र याच ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक आतिश अभिमान शेवाळे व सरपंच बकेराव भाऊसाहेब चव्हाण वय 50 मिळून प्रत्येकी ७५००₹ अशी १५०००₹ हजार रुपयाची लाच मागितली, यालाचेचे रक्कम पंचांनच समोर स्वीकारताना ग्रामसेवकास रंगेहाथ पकडण्यात आले व गुन्हा नोंदण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विभागीय आयुक्त व सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक वैशाली पाटील यांच्या समक्ष ही लाच स्विकारताना कारवाई करण्यात आली
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकचे पोलीस नाईक शरद हेंबाडे, पोलीस नाईक राजेंद्र गिते, चालक पोलीस नाईक परशराम जाधव यांच्या पथकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro