हिंगोलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे हिंगोली- नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे.
तसेच शंभर ते दीडशे मेंढ्यांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती आहे. कळमनुरीजवळ असलेल्या माळेगाव फाटा येथे मेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला आहे. अपघाताचे कारण अजून समोर आले नाही.
सकाळच्या सुमारास चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले.
पोलिसांना स्थानिकांच्या मदतीने जखमी नागरिकांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. यावेळी पाच जणांचा डॉक्टारांनी मृत घोषित केले असून सध्या जखमी झालेल्या मेंढ्यांवर पशुवैद्यकीय रुग्णालयामार्फत उपचार करण्यात येत आहेत.
धन्यवाद
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro