नारायणगाव येथे व्यापाऱ्यांनी लाल झालेली टोमॅटो खरेदी करण्यासाठी टाळाटाळ केल्यामुळे जुन्नर, पारनेर, आंबेगाव, शिरूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी टोमॅटोची विक्रीसाठी आणलेली प्रवाहवार टोमॅटो आज दुपारी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात ठेवून निषेध केला. यामुळे उपबाजारात टोमॅटोचा लाल सडा आला होता. काही वेळेस व्यापारी व शेतकरींमध्ये तणाव निर्माण झाला. उपबाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर खंडागळे, प्रियांका शेळके, सचिव रुपेश कवडे, उपसचिव शरद घोंगडे यांच्या मध्ये नंतर टोमॅटोची लिलाव पुन्हा सुरू झाली.
तापमानाच्या वाढीसारख्या कारणाने टोमॅटो लाल आणि खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे.मागील पंधरा दिवसांपासून टोमॅटोची आवक वाढली असल्यामुळे भाव मातीमोल झाले आहेत. यामुळे टोमॅटो उत्पादकांना कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला आहे.
सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत व्यापाऱ्यांनी चांगल् टोमॅटो प्रतवारी नुसार ५० रुपये ते १०० रुपये भाव देऊन खरेदी केली.टोमॅटो खरेदी नंतर चार ते पाच तासात फळातून पाणी सुटत असल्याने तोटा टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी लाल टोमॅटो खरेदी बंद केली आहे. व्यापाऱ्यांची मनधरणी करूनही टोमॅटोची खरेदी व्यापाऱ्यांनी बंद केली.
ह्या प्रकरणाची माहिती मिळताच बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे, भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष खैरे, माजी सरपंच योगेश पाटे, संचालक ज्ञानेश्वर खंडागळे, प्रियांका शेळके, माजी संचालक विपुल फुलसुंदर, प्रसन्ना डोके, बाबा परदेशी, बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे, उपसचिव शरद घोंगडे उपबजार आवारात येऊन त्यांनी शेतकरी प्रतिनिधी व व्यापारी प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली. या वेळी टोमॅटो टाकून देण्यावरून संचालक खंडागळे, पाटे व शेतकरी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. उपसचिव शरद घोंगडे यांनी शिल्लक टोमॅटो खरेदी करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.यानंतर तीन पासून लिलाव पूर्ववत सुरू झाला.
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro