Ticker

6/recent/ticker-posts

Kharif Sowing : सांगलीत खरीप पेरणीपूर्व मशागत कामांना सुरुवात

Kharif Sowing : सांगलीत खरीप पेरणीपूर्व मशागत कामांना सुरुवात
Agriculture Department : सांगली जिल्ह्यात कृषी विभागाकडून खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर खते आणि बियाण्यांची मागणी केली आहे.
Kharif Sowing In Sangli : सांगली जिल्ह्यात कृषी विभागाकडून खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर खते आणि बियाण्यांची मागणी केली आहे. त्यामुळे शेतकरी खरीप पेरणी पूर्व मशागतीसह अन्य कामांत व्यग्र झाला आहे.

सध्या वाढत्या उष्णतेमुळे सकाळच्या टप्प्यात शेतीतील कामे पूर्ण करण्याचे नियोजन शेतकरी करू लागला आहे.
खरीप हंगामातील सर्व पिकांच्या पेरण्या या पावसाच्या अंदाजावर होतात. त्यामुळे पेरणीपूर्व पाऊस या हंगामासाठी महत्त्वाचा असतो. जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. परंतु हा पाऊस मशागती करण्याइतपत झाला नाही.

त्यामुळे मशागती रखडल्या असल्याचे चित्र आहे. तरीदेखील शेतकरी मशागतीचे नियोजन करू लागला आहे.
जिल्ह्यात शिराळा तालुक्यात धूळ वाफेवर भाताची पेरणी केली जाते. मात्र, तालुक्यात वळीव पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे यंदा तालुक्यात धूळवाफेवरील भाताची पेरणी विलंबाने सुरू होण्याची शक्यता आहे.

त्याचप्रमाणे कडेगाव, पलूस तालुक्यांच्या काही भागांत आले पिकाची लागवड केली जाते. हळद लागवड सुरू झाली असली तर, गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असल्याने शेतकऱ्यांनी हळद लागवड थांबवली आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या