Ticker

6/recent/ticker-posts

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
तुळजापूर(जि. धाराशिव) : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून चिंचोली येथील एका ६२ वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तुळजापूर तालुक्यातील चिंचोली येथील शेतकरी विजयकुमार शहाजीराव पाटील (६२) हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. मात्र, सततच्या नापिकीमुळे फारसे उत्पादन निघत नव्हते. त्यामुळे ते नैराश्यात गेले होते. तर दुसरीकडे बॅंकेकडून घेतलेल्या पीक कर्जाचा डोंगरही वाढत चालला होता. शेतीतून उत्पादनच निघत नसल्याने बॅंकेकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे? याच विवंचनेत ते नेहमी असायचे. 
दरम्यान, ४ मे रोजी सकाळी १० वजण्याच्या सुमारास ते घराबाहेर पडले असता, परत आलेच नाही. यानंतर कुटुंबियांनी सर्वत्र शाेध घेतला. परंतु, त्यांचा काही तपास लागला नाही. असे असतानाच दोन दिवसानंतर ६ मे रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास महादेव पाटील यांच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याच्या अवस्थेत आढळून आले. यानंतर भाऊसाहेब पाटील यांनी तातडीने घटनेची माहिती तुळजापूर पोलीस ठाण्यास दिली. पोहेकॉ. अतुल यादव यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. यानंतर तुळजापूर ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

४ लाखांचे पीक कर्ज...मयत विजयकुमार शहाजीराव पाटील यांनी आपल्या शेतीवर एका खाजगी बॅंकेकडून सुमारे ४ लाख रूपयांचे सामायिक पीक कर्ज घेतले हाेते. सततच्या नापिकीमुळे या कर्जाची परतफेड होत नव्हती. त्यामुळे वर्षागणिक पीक कर्जाचा डोंगरही वाढत चालला होता. याच विवंचनेतून त्यांनी टाेकाचे पाऊल उचलले, असे नातेवाईकांनी माध्यमांना सांगितले.

धन्यवाद
🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या