Ticker

6/recent/ticker-posts

उन्हाळी ज्वारी लागवड तंत्रज्ञान

उन्हाळी ज्वारी लागवड तंत्रज्ञान

*उन्हाळी हंगामातसुद्धा मराठवाड्यामध्ये विशेषतः नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात ज्वारीची लागवड केली जाते.
*पेरणीचा कालावधी : उन्हाळी हंगामातील ज्वारीची काढणी पावसाच्या पूर्वी म्हणजेच मे महिन्यापर्यंत झाली पाहिजे. त्यासाठी पेरणी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ते जानेवारीच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत करावी. 

* पेरणी करताना रात्रीचे तापमान १० ते १२ अंश से. पेक्षा जास्त असावे. यापेक्षा उशिरा पेरणी केल्यास फुलोरा एप्रिल ते मे महिन्याच्या जास्त तापमानात सापडून बीजधारणा होत नाही. पर्यायाने उत्पादनात घट येते.

*वाणाची निवड : रब्बी हंगामातील सुधारित वाण (जसे मालदांडी, परभणी मोती, फुले वसुधा, अकोला क्रांती) उन्हाळी हंगामासाठी सरस आढळून आले आहेत. या व्यतिरिक्त खरीप हंगामातील परभणी श्‍वेता, पीव्हीके ८०९ आणि गोड ज्वारीचे सुधारित वाण फुले अमृता, एसएसव्ही ८४, सीएसएच-२२ यांचीसुद्धा लागवड करता येईल. 

*ताटांची योग्य संख्या : उन्हाळी ज्वारीची पेरणी दोन ओळींतील अंतर ४५ सें.मी. (१८ इंच) ठेवून करावी. उगवणीनंतर तीन आठवड्यांनी दोन रोपांतील अंतर १५ सें.मी. ठेवून विरळणी करावी आणि हेक्‍टरी ताटांची संख्या १,३५,००० ठेवावी.

*रासायनिक खताचा वापर : उन्हाळी ज्वारीचे पीक ओलिताखाली घेतले जाते. हेक्‍टरी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० पालाश द्यावे. त्यातील अर्धे नत्र व पूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणी वेळेस व अर्धे नत्र ३५ ते ४० दिवसांने पाण्याच्या पाळीसोबत द्यावे.

*आंतर मशागत : १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ कोळपण्या आणि एखादी निंदणी आवश्‍यक करावी.
पाण्याचे व्यवस्थापन : पेरणीनंतर १५ मी. रुंदीचे व २५ ते ३० मी. लांबीचे सारे पाडून त्याद्वारे पाणी द्यावे. पिकाच्या संवेदनशील अवस्थाप्रमाणे पाण्याच्या ४ ते ५ पाळ्या द्याव्यात.

धन्यवाद
🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या