तंत्र केसर आंबा लागवडीचे...
तंत्र केसर आंबा लागवडीचे... आंबा लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता आंबा लागवड ही घन पद्धतीने म्हणजेच 5 x 5 मीटर किंवा 5 x 6 मीटर अंतरावर केल्यास उत्पादन अधिक मिळते. या लागवडीत झाडातील अंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत मिळून येत नाही. त्यामुळे आपणास या बागेतून चारपट उत्पादन मिळते. आंब्याच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची एक मीटर खोल, काळी व त्या खाली नरम मुरूम असलेली जमीन चांगली. जमिनीचा सामू 6.5 ते 8.0 इतका असावा. मात्र 10 टक्क्यांपेक्षा जास्त चुनखडी असलेली जमीन आंबा लागवडीसाठी टाळावी. जमिनीच्या पोताप्रमाणे 8 x 8 किंवा 10 x 10 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्ड्याच्या तळाशी 20 ते 25 सें.मी. जाडीचा वाळलेल्या पालापाचोळ्याचा किंवा गवताचा थर द्यावा. असे करताना त्यात 50 ग्रॅम कार्बारिल पावडर धुरळावी. त्यानंतर या खड्ड्यात तीन टोपली चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट, चांगली कसदार काळी माती आणि 100 ग्रॅम कार्बारिल पावडर यांचे मिश्रण करावे. हे मिश्रण खड्ड्यावर थोडी शीग येईल इतके भरून घ्यावे. जमीन भारी असेल तर त्यात 30 टक्के चांगला मुरूम मिसळाव
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro