Ticker

6/recent/ticker-posts

हळद पिकांचे लागवड तंत्र

हळद
जमीन : पाण्याचा उत्तम निचरा होणारी, भुसभुशीत, मध्यम जमीन निवडावी. 
लागवडीची वेळ : मे जून अ) लागवडीची पद्धत सरी वरव्यावर (जेठे गढ़े गोल फक्त) किंवा रूंद वरंबा - बेणे लावावीत. 
ब) हेक्टरी बियाणे २२५० ते २५०० किलो (जेठे गड्डे).

 पूर्वमशागत : जमिनीस आडवी उभी नांगरणी केल्यावर ढेकळे फोडून वखरणी करावी. नंतर चांगले कुजलेले शेण ४०-५० गाड्या टाकून पुन्हा वखरणी करावी.

 सुधारित जाती : पीडीकेव्ही वायगांव, फुले स्वरुपा, राजापुरी, कृष्णा. लागवड सरी वरंब्याचे वाक्यामध्ये जेठे गड्डे असलेले वर्ण ३० ते ४० सें.मी. अंतरावर वरंबे करून त्यात २२५ सें.मी. अंतरावर लावावे. ठिबक सिंचनासाठी २० ते २५ सें.मी. उंचीचे १२० सेंमी. रुंदीचे गादी वाफे तयार करून सेंमी. वर लागवड करावी.

खत व्यवस्थापन : हेक्टरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद, १०० पालाश द्यावा यापैकी अर्धा नत्र उ झाल्यावर अंदाजे ३० दिवसांनी राहिलेला अर्धा नत्र पहिल्या नत्राच्या मात्रे नंतर ४५ दिवसानी द्यावा. 

ओलीत : दर ८-१० दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. जमिनीच्या मगदुराप्रमाणे किंवा पिकाच्या गरजेनुसार कालावधी कमी जास्त करावा. काढणी अगोदर १५ ते २० दिवस अगोदर पाणी देणे बंद करावे.

 आंतरमशागत: तण नियंत्रणासाठी पेडिमेथॅलीन १.५ किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टरी लागवडीनंतर दोन ते तीन दिवसांनी फवारणी करुन आठ आठवड्यांनी एक निंदणी करावी. तसेच झाडांना ८०-९० दिवसाच्या आतच मातीची भर द्यावी.

 पिकाचा कालावधी : हळद या पिकास २१० ते २७० दिवस कालावधी लागतो.

काढणी : पिकाची पाने पिवळी पडून ५० टक्के पेक्षा जास्त सुकू लागल्यावर पीक काढणीस तयार झाले असे समजावे. खोदून हळद पिकाची काढणी करतात. त्यापैकी जेठे गड्ढे व आंगठे गड्डे अशी विभागणी करून गोल गड्ढे बेणे म्हणून व आंगठे गड्ढे हळदीसाठी वापरावेत.
 उत्पादन : हळद पिकापासून २२० ते ३५० क्विंटल प्रति हेक्टर ओल्या हळदीचे उत्पादन मिळते.

धन्यवाद
🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या