Ticker

6/recent/ticker-posts

उन्हाळी हंगामातील ऊस पिकावरील रोगांचे नियंत्रणगेल्या काही दिवसांपासून ऊस पिकांवर आढळणाऱ्या रोगांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.उन्हाळ्यात पाण्याचा ताण, वाढलेले तापमान, यामुळे पिकाच्या शारीरिक क्रिया मंदावतात. पेशींची वाढ कमी होते, या कारणांमुळे पीक अशक्त होऊन त्याची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. परिणामी, पीक अनेक रोगांस बळी पडते. तसेच रोगाची तीव्रता देखील वाढते.महत्त्वाच्या रोगांचा प्रसार प्रमुख्याने बेण्याद्वारे होत असून बेणेमळ्यातील रोगांचे प नियंत्रण व व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.चाबूक काणी, गवताळ वाढ, मोझेक, यलो लीफ सिंड्रोम किंवा यलो लिफ डिसीज, रटून स्टंटींग (वाढ खुंटणे), हे प्रमुख रोग बेण्याद्वारे पसरतात.उन्हाळी हंगामामध्ये ऊस पिकावर येणाऱ्या या रोगांच्या नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजना यांचा माहिती घेऊ.

गवताळ वाढ -

रोगकारक घटक फायटोप्लाझ्मा हा शबेण्याद्वारे व किडीद्वारे (मावा आणि तुडतुडे) पसरतो.ऊस बेत मुळासकट उपटून जाळून टाकावे तसेच रोगमुक्त बेण लावाव. उष्णजल प्रक्रिया करावी व रसशोषणाऱ्या किडींचा बंदोबस्त करावा.रोगाचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास त्या पिकाचा खोडवा घेऊ नये. पिकाची फेरपालट करावी. त्यामुळे रोगाचे प्रमाण पुढील पिकात कमी राहील.


ऊसावरचा तांबेरा - 

हा बुरशीजन्य रोग आहे. संपूर्ण पान ताम्बेरायुक्त होते.  ८६०३२ सारखी प्रतिकारक जात लावावी. रोगग्रस्त वाळलेली पान काढून जाळून टाकावीत.उसाला लहानपणी पाण्याचा तान पडू देऊ नये.पाण्याची दलदल होऊ देऊ नये.  तांबेऱ्याच्या नियंत्रणासाठी डायथेन एम. ४५, ३ ग्रॅम + १ लिटर पाणी याचं मिश्रण १० दिवसांच्या अंतराने २ -३ वेळा फवारावे.


चाबूक काणी किंवा काजळी-

पीकवाढीच्या सर्व अवस्थेत या रोगाचा प्रादुर्भाव होतो.रोगामुळे उसाची पाने अरुंद व आखूड राहतात.हा रोग मुख्यत्वे प्रादुर्भावग्रस्त बेण्यामार्फत तसेच वारा, पाऊस, पाणी, कीटक व जमिनीमार्फत पसरतो.मध्यम रोगप्रतिकारक जातींची उदा. कोसी ६७१, को ८६०३२, व्हीएसआय ४३४, कोएम ०२६५, कोव्हीएसआय ०३१०२, को १५०१२ लागवड करावी.चाबूक काणी प्लास्टिकच्या पोत्यात काढून घेवून ते सर्व बेत मुळासह उपटून जाळून टाकावे,  बेण्यास उष्णजल प्रक्रिया करावी.  तसंच १०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम + १०० लिटर पाण्यात कांडीप्रक्रिया करावी.  रोगप्रतिकारक ६७१, ८६०३२, ९४०१२ या जाती लावाव्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या