Ticker

6/recent/ticker-posts

आई साठी ९-वीत शिकणाऱ्या प्रणय नी खोदली विहीर

 


कैलास सोनवणे (दिघवद): फोटोत दिसणारा मुलगा कुमार प्रणय रमेश सालकर हा केळवे ( पालघर ) गावातील एका पाड्यावर राहाणारा व इयत्ता ९ वीत शिकणारा आदिवासी मुलगा. दिवसभर शेतावर काम केल्यानंतर आपल्या आईला दूरवरून पाणी आणावे लागते हे बघून त्याच मन अस्वस्थ होत असे.

 म्हणून या उन्हाळ्याच्या सुट्टीत सलग पाच सहा दिवस स्वतः कष्ट करून जिद्दीने आपल्या झोपडीच्या छोट्याश्या परसदारात त्याने जवळ जवळ २० फूट खोल विहीर खोदली. विहिरीला छान गोड पाणी लागल आहे. आता आपल्या आईला पाणी आणण्यासाठी लांबवर जाव लागणार नाही म्हणून तो खूप खुश आहे.

 चांगले संस्कार सुशिक्षित घरातच होतात अस नाही आणि मातृप्रेम व्यक्त करायला सुद्धा फक्त मदर्स डे चीच आवश्यकता आहे असही नाही. मुलाचं कौतुक करताना गावचे सरपंच आणि सोबत मुलाची आई.

रमेश तुला कडक सलाम. इतक्या वयात ही तुझी विचार करण्याच्या क्षमता एकदम जबरदस्त आहे 🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या