Ticker

6/recent/ticker-posts

पिंपळगाव बसवंत येथे ‘मधुक्रांती’ राज्यस्तरीय परिषद

Madhu Kranti : पिंपळगाव बसवंत येथे ‘मधुक्रांती’ राज्यस्तरीय परिषद
‘ग्रीनझोन ॲग्रोकेम’ संचलित बसवंत मधमाशी उद्यान व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने २० व २१ मे दरम्यान ‘बसवंत मधुक्रांती-२०२३’ या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
Nashik News ‘ग्रीनझोन ॲग्रोकेम’ संचलित बसवंत मधमाशी उद्यान व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने २० व २१ मे दरम्यान ‘बसवंत मधुक्रांती-२०२३’ या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी पाच विभागांमधील मधुउद्योजकांना (Honey Production) विशेष पारितोषिके देऊन सन्मान होईल.
पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथे मुखेड रोड येथील बसवंत गार्डन येथे होणाऱ्या या परिषदेत मधुमक्षिकापालन क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करतील. निवडक सहभागींचे अनुभवकथन व माहितीपूर्ण परिसंवादाचा लाभ यावेळी उपस्थितांना होईल, अशी माहिती ‘ग्रीनझोन’चे कार्यकारी संचालक संजय पवार यांनी दिली.
‘बसवंत मधुक्रांती २०२३’ पुरस्कारांची निवड ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बी. बी. पवार, ‘ग्रीनझोन ॲग्रोकेम’चे तांत्रिक संचालक डॉ. भास्कर गायकवाड यांच्या समितीने केली.

यात मधमाशी पालनाच्या प्रसाराचे लक्षणीय कार्य करणाऱ्या शहापूर (जि. अमरावती) येथील ‘शिवस्फूर्ती प्रोसेसिंग फाउंडेशन’ संस्थेला पुरस्कार जाहीर झाला आहे.

तसेच कृतिशील मधमाशी पालन प्रचारक म्हणून कणेरी मठ (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील दयावान पाटील यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. २०१९ पासून सलग हा उपक्रम सुरू आहे. हे पाचवे वर्ष आहे.

धन्यवाद
🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या