Ragi For Free : तामिळनाडू राज्य सरकारची नाचणी योजनेची घोषणा
Tamilnadu News : लोकांच्या आहारात नाचणीचा वापर (Ragi use) वाढविण्यासाठी तामिळनाडू राज्य सरकारने नाचणी योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील रेशनकार्डधारकांना २ किलो नाचणी मोफत मिळणार आहे.
तामिळनाडू सरकारने नुकतीच राज्याचे सहकारमंत्री के. आर. पेरियाकरुप्पन आणि पर्यटनमंत्री के. रामचंद्रन आणि अन्न व ग्राहक संरक्षण मंत्री आर. सक्करपाणी यांच्या उपस्थितीत नाचणी योजनेची (Ragi scheme) घोषणा केली.
आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाचे औचीत्य साधून तामीळनाडू राज्य शासनाने नाचणीचा खप वाढविण्यासाठी सरकारी नाचणी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. राज्याचे पर्यटनमंत्री के. रामचंद्रन यांच्या उपस्थितीत या योजनेची घोषणा करण्यात आली.
प्रथम राज्यातील धर्मापुरी आणि निलगिरी या दोन जिल्ह्यांमध्ये नाचणीचे उत्पादन जास्तीत जास्त व्हावे यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. सुमारे ३ लाख रेशन कार्डधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत प्रत्येक कार्डधारकाला तांदळाऐवजी दोन किलो नाचणी मिळणार आहे. गव्हाचे वाटप समायोजित केले जाणार असल्याने नाचणीसाठी अन्न विभाग अतिरिक्त खर्च करणार नाही.प्रतिसाद पाहून नंतर इतर जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे.
एफसीआयच्या माध्यमातून धर्मपुरी आणि निलगिरी जिल्ह्यांसाठी १३५० मेट्रिक टन नाचणी मागवली जात आहे. नाचणीमध्ये असलेले लोहाचे प्रमाण, फायबर आणि कॅल्शियम अशा पौष्टिक घटकांमुळे भरडधान्यांपैकी नाचणीची निवड करण्यात आली.
धन्यवाद
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro