Ticker

6/recent/ticker-posts

अळिंबीबाबत मार्गदर्शन

अळिंबीबाबत मार्गदर्शन


धिंगरी अळिंबीच्या लागवडीसाठी नैसर्गिक तापमान 22 ते 30 अंश सेल्सिअस आणि हवेतील आर्द्रता 65 ते 90 टक्के असणे आवश्‍यक असते. धिंगरी अळिंबीची लागवड शेतातील पिकांच्या मळणीनंतर निरुपयोगी अशा वाळलेल्या काडावर व पालापाचोळ्यावर करता येते. यासाठी मुख्यतः भात व गव्हाचे काड, ज्वारी, बाजरी, मका यांची ताटे व पाने, सोयाबीन व तूर यांच्या काड्या, भुईमुगाच्या शेंगांची टरफले इत्यादी वाळलेल्या काडाचा व पालापाचोळ्याचा वापर करता येतो. लागवडीसाठी लागणारे काड व पालापाचोळा हे माध्यम चालू हंगामातील व न भिजलेले असावे. धिंगरी अळिंबीची लागवड प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये केली जाते. त्यासाठी वेगवेगळ्या आकारांच्या पिशव्या वापरल्या जातात. अळिंबीचे शुद्ध बियाणे (स्पॉन) खात्रीशीर संस्थेकडून लागवडीपूर्वी एक-दोन दिवस आणून ठेवावे. अळिंबी उत्पादनासाठी प्रशिक्षण आवश्‍यक आहे.

धन्यवाद
🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या