Ticker

6/recent/ticker-posts

भारतातील आंब्याच्या प्रसिद्ध जाती

महाराष्ट्र 

हापूस : महाराष्ट्रातील हा आंबा सर्वात महाग विकला जातो आणि जगातील इतर भागांमध्ये देखील निर्यात केला जातो.आंबा हा भारतात आढळणाऱ्या आंब्याच्या सर्वोत्कृष्ट जातींपैकी एक आहे.हापूसचे उत्पादन पश्चिम भारतात प्रामुख्याने कोकणात होते.महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्‍नागिरी येथील हापूस आंबे उत्तम मानले जातात.रत्नागिरी हा आंबा रत्नागिरी, देवगड, रायगड आणि कोकण या भागात आढळतो आणि विशेष म्हणजे प्रत्येक आंब्याचे वजन सुमारे १५० ते ३०० ग्रॅम असते.

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा 

बंगीनापल्ली : हापूस आंब्यापेक्षा आकाराने मोठ्या असलेल्या या आंब्याच्या जातीचे उत्पादन आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील बानागनपल्ले येथे केले जाते.

तोतापुरी : पिकल्यावर आंबा हिरवट रंगाचा असतो आणि पोपटाच्या चोचीसारखे दिसतो.

कर्नाटक  

रासपुरी : म्हैसूर येथे मोठ्या प्रमाणावर पिकवला जाते. ते अंडाकृती आकाराचे आणि सुमारे ४ ते ६ इंच लांब असतात.भारतात आंब्याची राणी म्हणून ओळखली जाते.

बदामी : बदामी ही कर्नाटकातील आघाडीची आंब्याची जात असून एप्रिल ते जुलै या कालावधीत हा आंबा बाजारात येतो.हा आंबा कर्नाटक राज्यातील अल्फोन्सो म्हणून प्रसिद्ध आहे.

गुजरात

केसर : आंबाच्या रंग केशरसारखा दिसतो व सर्वात महागड्या जातींपैकी एक जात आहे.

पायरी : सालीला तांबूस रंगाची छटा आणि चवीला आंबट असे हे फळ गुजरातमध्ये आमरस बनवण्यासाठी जास्त वापरतात.

पश्चिम बंगाल

हिमसागर : पिवळ्या सालीसह हिरव्या रंगाचे असतात.हे फळ मध्यम आकाराचे असून त्याचे वजन २५०-३५० ग्रॅम दरम्यान असते आणि हे डेझर्ट आणि शेक बनवण्यासाठी वापरले जाते.

गोवा

मालगोवा : ३००-५०० ग्रॅम वजनाचा आकार तिरकस गोलाकार असतो.

उत्तर प्रदेश

लंगडा: जुलै ते ऑगस्टपर्यंत बाजारात उपलब्ध होतात.उगम उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झाला आहे.पाय नसलेल्या माणसाच्या शेतात पहिल्यांदा त्याची लागवड केली गेली होती, म्हणून या आंब्याच्या जातील लंगडा म्हणतात.

बिहार-

चौसा : ह्या जातीला बिहारमधील एका शहराचे नाव दिले गेले आहे. पिवळ्या-सोनेरी रंगाचा असतो.

मालदा : बिहारमधील ‘आंब्याचा राजा’ म्हणून ओळखले जाते. हा आंबा चवीला गोड-आंबट असून तो रसाळ आणि स्वादिष्ट आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या