जमीन : पाण्याचा उत्तम निचरा होणारी, भुसभुशीत, मध्यम जमीन निवडावी.
लागवडीची वेळ : मे जून अ) लागवडीची पध्दत: सरी वरंब्याचे वाक्यामध्ये बेणे रोवून हेक्टरी बियाणे १००० १२०० किलो (बारीक), १४००-१५०० किलो (जाड)
पूर्वमशागत: शेतास आडवी उभी नांगरणी केल्यावर ढेकळे फोडून वखरणी करावी. नंतर चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी ५० गाड्या टाकावे व पुन्हा वखरणी करावी. जाती माहीम, सुप्रिया, रिओडिजानिरो, चायना, व्यानाड, जी ५५-१, सुरभी
लागवड : सरी वरंब्याचे वाफ्यामध्ये २०-२५ ग्रॅम वजनाचे तुकडे करून ३० x २२.५ सें.मी. अंतरावर लावावे.
खत व्यवस्थापन हेक्टरी ५० किलो नत्र २५ किलो स्फुरद २५ किलो पालाश द्यावा यापैकी पूर्ण स्फुरद आणि पूर्ण लागवडीसोबत तर लावणीनंतर ३० दिवसांनी अर्धा नत्र व राहिलेला अर्धा नत्र त्यानंतर ६० दिवसानी द्यावा.
ओलीत दर ८-१० दिवसानी पाण्याच्या पाळ्या द्याव्या. जमिनीचा मगदूर व पिकाच्या गरजेनुसार हा कालावधी कमी जास्त करावा.
आंतरमशागत पीक स्वच्छ व निरोगी राहण्यासाठी २-३ निंदण द्यावे. झाडांना मातीची भर द्यावी. शक्य झाल्यास
सावली देणारी झाडे (एडी) पिकामध्ये लावावीत. पिकाचा कालावधी आले हे पीक साधारणपणे २७० दिवसात तयार होते.
काढणी पिकाची पाने ५० टक्के पेक्षा जास्त पिवळी पडून सुकू लागल्यावर पीक काढणीस तयार झाले असे समजावे. नंतर खोदून पिकाची काढणी करावी.
हेक्टरी उत्पादन १०० ते १५० किंटल ओल्या अद्रकाचे उत्पादन मिळते.
धन्यवाद
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro