Kharif Season 2023 : या वर्षी उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात आहे. पाऊस हुलकावणी देत आहे. पाऊस नसल्याने मशागती ठप्प आहेत.
Jalgaon News : जिल्ह्यात मृग नक्षत्रावर खरीप हंगामातील पेरण्या केल्या जातात. मात्र मृग नक्षत्र सुरू झाले, तरी पेरण्या झालेल्या नाहीत. या वर्षी उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात आहे. पाऊस हुलकावणी देत आहे.
पाऊस नसल्याने मशागती ठप्प आहेत. यामुळे या वर्षीचा मृग नक्षत्रातील खरिपाचा पेरा हुकला आहे. पावसाच्या आगमनानंतर मशागती होऊन पेरण्या होतील. त्यामुळे पेरण्या लांबणीवर पडणार आहेत. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
या वर्षी जूनचा पहिला आठवडा संपला, तरी पावसाचे आगमन नाही. मागील वर्षी जूनमध्ये खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या. दरवर्षी उन्हाळ्यात होत असलेल्या पावसामुळे खरीपपूर्व मशागती होत. या वर्षी उन्हाळी पाऊसही झालाच नाही. मृगावर शेतकरी ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग, चवळी, तूर, सूर्यफूल, सोयाबीनची पेरणी करत.
सध्या ऊन व ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी शेणखताचे शेतात ढीग मारले आहेत. मशागती खोळंबल्या आहेत. काही ठिकाणी पाऊस होईल, या आशेवर खरीप पेरणीपूर्व मशागती करताना दिसत आहेत. तालुक्याच्या ठिकाणी कृषी केंद्र ओस पडू लागल्याचे चित्र आहे.
शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी लागणारे बी-बियाणे, खते अद्यापही खरेदी केलेली नाहीत. त्यामुळे कृषी दुकानदार ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकरी पावसाची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहेत. पाऊस पडल्यानंतरच खरिपाच्या पेरण्या होणार असून, खरीप हंगाम लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
धन्यवाद
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro