Ticker

6/recent/ticker-posts

Onion Rate : कमी दराच्या मुद्द्यावर विंचूरला कांदा लिलाव पाडले बंद

Onion Rate : कमी दराच्या मुद्द्यावर विंचूरला कांदा लिलाव पाडले बंद
Onion Market : शेतकरी संतप्त; संचालक आणि पोलिस प्रशासनाची मध्यस्थी
Onion auction : विंचूर, ता. निफाड : लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारात कांद्याला लिलावामध्ये गुरुवारी (ता. १५) रोजी सकाळी पहिल्या सत्रात कमी दर पुकारल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून सुमारे तासभर आंदोलन केले.


विंचूर उपबाजारात सकाळी शेतकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळाला. कांद्याचे लिलाव सुरू झाले. मात्र, कांद्याला लिलावात अवघे २०० ते ५०० रुपये इतका कमी भाव मिळाला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी तत्काळ लिलाव बंद पाडले.

त्यानंतर बाजार समिती कार्यालयाला घेराव घातला. बुधवारी (ता. १४) तुलनेत गुरुवारी (ता. १५) ३०० ते ४०० रुपयांची घसरण झाल्याचे लक्षात येताच संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडत बाजार समितीच्या प्रशासनाला वेठीस धरले.
या वेळी बाजार समितीचे संचालक संदीप दरेकर, छबू जाधव, राजेंद्र बोरगुडे, सहायक सचिव प्रकाश कुमावत यांच्यासह लासलगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक राहुल वाघ यांनी मध्यस्थी करत कांद्याचे लिलाव पूर्ववत करण्याची मागणी शेतकऱ्यांजवळ केली.

लिलाव झालेल्या वाहनांचे फेर लिलावात कांद्याचे बाजार भाव न सुधारल्यास आपले आंदोलन सुरू ठेवा. मात्र फेर लिलाव एकदा होऊन द्या, या तोडग्यानंतर फेर लिलावामध्ये १०० रुपयांनी वाढून बाजारभाव मिळाला. मात्र संचालक मंडळ गेल्यानंतर कांद्याच्या बाजारभावाची परिस्थिती नंतर ‘जैसे थे’ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

धन्यवाद
🙏🙏🙏



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या