Ticker

6/recent/ticker-posts

Monsoon Rain : सिंधुदुर्गात मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी

Monsoon Rain : सिंधुदुर्गात मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी
Monsoon Rain Update : मॉन्सूनचे ८ जूनला केरळमध्ये आगमन झाले. त्यानंतर जिल्हावासीयांना मॉन्सूनची प्रतीक्षा लागली आहे.
Sindhudurga News : जिल्ह्यात शनिवार (ता. १०) पहाटेपासून मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली असून सर्व जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
मॉन्सूनचे ८ जूनला केरळमध्ये आगमन झाले. त्यानंतर जिल्हावासीयांना मॉन्सूनची प्रतीक्षा लागली आहे. जिल्ह्यात शुक्रवार (ता. ९) सायकांळपासून ढगाळ वातावरण तयार झाले होते. रात्री उशिरा थंड वारे सुरू झाले.


कोणत्याही क्षणी पाऊस पडेल असे वातावरण तयार झाले होते. दरम्यान पहाटे पाच वाजता जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, कणकवली आणि वैभववाडी तालुक्यांच्या सर्व भागांत पावसाच्या सरी पडल्या.
अर्धा एक तासाच्या फरकाने पावसाच्या सरी कोसळत होत्या. काही भागांत विजांचा कडकडाटदेखील झाला. कणकवलीच्या काही भागांत दमदार सरी पडल्या. जिल्ह्यात सर्वत्र दुपारपर्यंत पावसाच्या सरी पडत होत्या. सर्वत्र पावसाळी वातावरण तयार झाले आहे.


पावसाच्या सरींमुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. हा मॉन्सूनचा पाऊस नसला तरी मॉन्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. काही शेतकऱ्यांनी भात रोपवाटिका तयार करण्याच्या कामाला सुरुवात देखील केली आहे.

धन्यवाद
🙏🙏🙏


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या