काजीसांगवी(उत्तम आवारे): मराठा विद्या प्रसारक समाज संचालित कै. नरहरपंत कारभारी ठाकरे जनतामाध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काजीसांगवी येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात खेळाडूंना हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. कार्यक्रमस्थळी उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष बाबुराव सोनवणे व सर्व सदस्य, माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष दौलतराव ठाकरे व सर्व सदस्य,विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक चित्तरंजन न्याहारकर ,सेवक संचालक जगन्नाथ निंबाळकर,पर्यवेक्षक सुभाष पाटील ,क्रिडा शिक्षक अर्जुन आहेर, दिपक ठाकरे (पोलीस पाटील )उपस्थित होते. याप्रसंगी विद्यालयाचे क्रिडा शिक्षक तसेच मविप्र सेवक संचालक जगन्नाथ निंबाळकर यांनी ऑलिम्पिक दिनाची माहिती सांगितली .त्यात त्यांनी ऑलम्पिक दिनाची सुरवात, ऑलिम्पिक चिन्ह ,बोधवाक्य व ऑलिम्पिक स्पर्धा याविषयी माहिती दिली.त्यानंतर न्याहारकर सर यांनी अध्यक्षीय भाषण केले.
ऑलम्पिक दौड मध्ये विद्यालयातील उदयोन्मुख खेळाडू व विद्यार्थ्यांनी तसेच सर्व शिक्षक यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी यांनी सहकार्य केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान कोल्हे यांनी केले.




0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro