Ticker

6/recent/ticker-posts

Soymeal Export : सोयापेंड निर्यात पोहोचली १४ लाख ५३ हजार टनांवर

Soymeal Export : सोयापेंड निर्यात पोहोचली १४ लाख ५३ हजार टनांवर
Soybean Market : यंदा देशातील सोयाबीनचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा वाढले. त्यातच गेल्या हंगामातील शिल्लक साठाही जास्त होता. त्यामुळे यंदा देशात १५४ लाख टनांचा पुरवठा झाला.
Pune News : यंदा देशातील सोयाबीनचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा वाढले. त्यातच गेल्या हंगामातील शिल्लक साठाही जास्त होता. त्यामुळे यंदा देशात १५४ लाख टनांचा पुरवठा झाला. देशात मे महिन्यापर्यंत बाजारातील आवक गेल्या वर्षीपेक्षा जास्त राहिली. बाजारात मे पर्यंत ९१ लाख टनांची आवक झाली. तर सोयापेंड निर्यात १४ लाख ५३ हजार टनांवर पोहोचली, असे सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ‘सोपा’ने सांगितले.
देशातील बाजारात मागील चार महिन्यांपासून सोयाबीनचे भाव दबावात आहेत. शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा असल्याने माल मागे ठेवला. पण शेतकऱ्यांना अपेक्षित असा भाव अजून मिळाला नाही.

मागील हंगामात सोयाबीनला ८ हजारांचा भाव पहिल्यानंतर यंदाही बाजार याच दिशेने जाईल, अशी आशा होती. पण गेल्यावर्षी मार्चनंतर वाढलेला सोयाबीन बाजार यंदा मात्र दबावात आला. चालू हंगामात सोयाबीनने ६ हजारांचाही टप्पा पार केला नाही. परिणामी अजूनही अनेक शेतकरी सोयाबीनचा स्टॉक ठेवून आहेत.
सोपा’ने मे महिन्याच्या अंदाजात यंदा बाजारातील आवक वाढल्याचे म्हटले आहे. ‘सोपा’च्या मते, ऑक्टोबर ते मे या काळात देशातील बाजारात ९१ लाख टन सोयाबीनची आवक झाली होती.

गेल्या हंगामात याच काळातील आवक ७० लाख टन होती. म्हणजेच यंदा २१ लाख टनांनी जास्त आवक राहिली. यंदा गेल्यावर्षीपेक्षा सोयाबीन पुरवठा जास्त असला तरी बाजारातील आवक जास्त झाल्याने आता शिल्लक माल कमी राहिला.
देशाचा सोयापेंड वापर वाढला

देशातील सोयापेंड वापराचा विचार करता यंदा मानवी आहार आणि पशुखाद्यतही वापर वाढला आहे. मानवी आहारात सोयापेंडचा वापर यंदा १ लाख टनांनी वाढून ६ लाख २५ हजार टनांवर पोहोचला. पशुखाद्यातील वापरही साडेतीन लाख टनांनी वाढला. देशातील पशुखाद्य उद्योगाने आतापर्यंत ४२ लाख ५० हजार टनांची उचल केली, असेही ‘सोपा’ने म्हटले आहे.


५९ लाख टन सोयाबीन साठा शिल्लक

‘सोपा’च्या मते, यंदा देशात १२४ लाख टनांचे उत्पादन झाले. तर मागील हंगामातील २५ लाख टन शिल्लक साठा होता. त्यामुळे यंदा १५४ लाख टनांचा पुरवठा झाला. जो गेल्यावर्षीपेक्षा २८ लाख टनांनी जास्त होता.

यंदा एकूण पुरवठ्यापैकी ९१ लाख टन सोयाबीन मे पर्यंत बाजारात आले. आता शेतकरी, प्रक्रिया प्लांट्स, व्यापारी यांच्याकडे ५९ लाख टनांचा स्टॉक आहे. गेल्या हंगामात हा ५३ लाख टनांचा होता, असेही ‘सोपा’ने स्पष्ट केले.

धन्यवाद
🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या