Ticker

6/recent/ticker-posts

Sheep New Breed : अधिक पिले देणाऱ्या मेंढीच्या जाती विकसित

Sheep New Breed : अधिक पिले देणाऱ्या मेंढीच्या जाती विकसित
Sheep Farming : पूर्वी लोकर उत्पादनासाठी मेंढीपालन केले जाई. मात्र दरात सातत्याने होत चाललेल्या घटीमुळे मेंढीपालकांकडून मांस उत्पादनाच्या दृष्टीने नव्या जातींची मागणी होत आहे. त्यामुळे राजस्थान येथील केंद्रीय मेंढी आणि लोकर संशोधन संस्थेने अधिक मांस आणि पिले देणाऱ्या जातींचा विकास करण्यावर भर दिला आहे.
Traditional Sheep Farming : भारतातील पारंपरिक मेंढीपालनाला संशोधनाचा आधार देण्याच्या उद्देशाने १९६२ मध्ये राजस्थानमधील अविकानगर येथे भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली.

मांस, दूध आणि लोकर याचे उत्पादन वाढ याविषयी संस्था काम करते. मेंढीमध्ये ७० ते ८० टक्‍के मांस, २० टक्‍के लोकर व अन्य घटक ५ ते ७ टक्‍के राहतात.

या केंद्रात १९७६ पासून सिरोही शेळीवर संशोधन सुरू आहे. देशामध्ये दक्षिण भारतात मेंढीपालन अधिक होत असल्याचे या केंद्राचे संचालक डॉ. अरुणकुमार तोमर यांनी सांगितले.
लोकरची मागणी झाली कमी

चीनमधून येणारा कृत्रिम धागा व कापड निर्मितीतील अन्य स्वस्त साहित्य यामुळे लोकरीची देशांतर्गत मागणी कमी होत आहे. वास्तविक आरोग्यासाठी पोषक असूनही लोकरच्या दरावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.

केवळ लोकरीसाठी मेंढीपालन करणे आता तितके फायद्याचे राहिलेले नाही. मांस उत्पादनासाठी मेंढीच्या योग्य त्या जातींच्या विकासासाठी केंद्रीय मेंढी आणि लोकर संशोधन संस्थेने प्रयत्न सुरू केले आहेत. आपल्या संशोधन धोरणामध्ये वेळीच बदल करून नव्या जाती विकसित केल्या आहे.

सुरुवातीला देशी ‘मालपुरा’ जातीच्या मेंढीसोबत ‘रेम्बुले’ जातीच्या विदेशी मेंढराचा क्रॉस करून ‘अविकालीन’ ही नवी मेंढी जात विकसित केली आहे. ‘मेरीनो’ ही थंड प्रदेशासाठी लोकर उत्पादनासाठी चांगली मेंढी आहे. मेरीनो ही ‘चोकला’ आणि ‘रशियन मेरीनो’ सोबत संकरातून विकसित केली आहे. हिमाचल, जम्मू, तमिळनाडूच्या पहाडी भागात ती पाळली जाते.

तीन मेंढीच्या संकरातून ‘अविशांत’

मालपुरा, गेहरोल, पाटणवाडी या तीन देशी मेंढींच्या संकरातून ‘अविशांत’ ही नवीन जात विकसित केली आहे. या जातीच्या मेंढीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे दूध उत्पादनही अधिक आहे. तिचा आयुष्यकाळ मोठा आहे.

मूळ मेंढ्या प्रति वेत केवळ एकच पिलू देतात. त्यापासून संकरातून विकसित केलेली अविशांत मेंढी एका वेतामध्ये दोन ते चार पिले देते. त्यामुळे मेंढ्याचा कळप वेगाने वाढून एकूण मांस उत्पादनही वाढते.

...अशी आहे मांस उत्पादकता

एका मेंढीपासून सरासरी ९०० ग्रॅम ते १ किलो लोकर मिळते. एका मेंढीपासून पूर्वी सहा ते सात किलो मांसाचे उत्पादन होत असे. मात्र आता केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन संस्थेने विकसित केलेल्या नवीन जातीचे मांस उत्पादन १२ ते १३ किलो इतके आहे.


धन्यवाद
🙏🙏🙏



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या