महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा खरीप हंगामासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात या तीन राज्यांसाठी प्रसारीत करण्यात आलेले असून सुमारे आठ वर्षांपासून या वाणाचे संशोधन सुरु होते.राज्यातील पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुरीचा बहुतांश भाग सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे.विद्यापीठाने तुरीचे फुले राजेश्वरी हे विकसित केले असून हे वाण महाराष्ट्रासाठी शिफारशीत करण्यात आले आहे.राज्यात या जातीच्या तुर पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते.अहमदनगर, सोलापूर आणि नाशिक या जिल्ह्यात या वाणाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
फुले राजेश्वरी वाणाचे वैशिष्ट्ये -
विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाणाची पेरणी केल्यानंतर साधारणता १५० दिवसात पीक तयार होते.
हे वाण मर आणि वांझ रोगास प्रतिकारक आहे.
दाणे मध्यम आणि लाल रंगाचे असतात तसेच बाजारात या जातीच्या वाणाला मोठी मागणी आहे.
तुरीच्या या वाणापासून शेतकऱ्यांना १२ ते १४ क्विंटल प्रति एकरपर्यंतचे उत्पादन मिळू शकते असा दावा केला आहे, या तुरीच्या जातीतूपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते.
पेरणी करताना एकरी एक किलो बियाणे पुरेसे ठरते, म्हणजे या जातीपासून कमी उत्पादन खर्चात अधिकचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळवता येते.

0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro