Ticker

6/recent/ticker-posts

Rain Forecast : पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

Rain Forecast : पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा
Weather Forecast : पूर्व विदर्भात मॉन्सून दाखल झाला असतानाच, पावसाने हजेरी लावल्याने उष्णतेची लाट निवळली आहे.
Weather Update Pune : पूर्व विदर्भात मॉन्सून दाखल झाला असतानाच, पावसाने हजेरी लावल्याने उष्णतेची लाट निवळली आहे. राज्यात सर्वच ठिकाणी कमाल तापमान चाळीशीच्या खाली आले आहे. आज (ता. २४) पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) असून, उर्वरित विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता आहे. कोकणात पाऊस जोर धरण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


विदर्भातील अमरावती येथे राज्यातील उच्चांकी ३९.६ अंश सेल्सिअस, तर अकोला, वाशीम, धुळे येथे ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पावसाला पोषक हवामान, वाहणारे वारे यामुळे कमाल तापमानाचा पारा चाळीस अंशांच्या खाली घसरला आहे. विदर्भातील उष्णलाट निवळली आहे. उर्वरित राज्यात तापमान ३३ ते ३८ अंशाच्या दरम्यान आहे.

उत्तर प्रदेशमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निवळले असून, या भागात चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणालीपासून पंजाबपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. गुजराच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत असून, दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर केरळच्या किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे.
विदर्भात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. दिवसभर विदर्भात ढगांची दाटी झाली होती. कोकण किनाऱ्यालगत अरबी समुद्रात ढग जमा होऊ लागले असून, उर्वरीत राज्यातही अंशतः ढगाळ हवामान होते. आज (ता. २४) पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यात पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : जव्हार ४०, गुहागर २०, दापोली, म्हसळा प्रत्येकी १०.

मध्य महाराष्ट्र : श्रीरामपूर ३०, महाबळेश्वर १०.

मराठवाडा : लातूर २०.

विदर्भ : नागपूर कृषी महाविद्यालय ६०, भामरागड, सिरोंचा, गोंदिया, कोर्ची, देवरी प्रत्येकी ४०, भंडारा, मुलचेरा, साकोली, लाखणी, आर्वी, अर्जुनी मोरगाव प्रत्येकी ३०, एटापल्ली, नरखेडा, कुही, तिरोडा, हिंगणा, धानोरा, सडक अर्जूनी, धामणगाव रेल्वे, अमरावती, आष्टी, मोहाडी, गोंदिया, बल्लारपूर, काटोल प्रत्येकी २०.

जोरदार पावसाचा इशारा (आरेंज अलर्ट) :

चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर.

वादळी पावसाचा इशारा :

नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा.

धन्यवाद
🙏🙏🙏



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या