shadhi Ekadashi Wishes in Marathi: महाराष्ट्रात आषाढी एकादशीला फार महत्व आहे. या दिवशी पंढरपूर येथे जत्रा भरते. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाने भावीक आणि वारकरी उत्साही आणि आनंदी होतात. दूरदूरच्या देशातून पंढरपूरला होणाऱ्या वारकरींमुळे पंढरी दुमदुमून जाते. विठ्ठलाच्या भेटीने वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर येणारे हास्य, उत्साह याला कसलीच तोड नाही. आषाढी एकादशीला आणखी खास करण्यासाठी 'या' शुभेच्छा संदेशाचा उपयोग होईल, वाचा आणि पाठवा.
उद्या २९ जून २०२३ रोजी आषाढी एकादशी असून, या एकादशीला अत्यंत महत्व आहे. या एकादशीला देवशयनी एकादशी देखील म्हटले जाते. श्री विठ्ठल समस्त वारकरी सांप्रदायिकांसह सर्वांचेच आवडते दैवत असल्याने ही एकादशी भाविकांसाठी उदंड उत्साहाची ठरणार आहे. यंदा आषाढी एकादशीसाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर दिंड्या पंढरपूर येथे गेल्या आहेत. ज्यांना पंढरपुरात जाणे शक्य नाही, त्यांची उपस्थिती स्थानिक परिसरात होणाऱ्या सार्वजनिक उत्साहात असेल. यंदा एकादशीच्या दिवशी भाविकांची उसळणारी गर्दी विचारात घेऊनच मंदिरांच्या वतीने नियोजन केले जात आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाने भावीक आणि वारकरी उत्साही होतातच, तसेच आपल्या आप्तस्वकीयांना, नातलगांना या एकादशीच्या शुभेच्छा देण्यासाठी हे खास शुभेच्छा संदेश. वाचा, पाठवा आणि स्टेटस ठेवा.
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
"देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई,
सुखालाही आला या हो आनंदाचा पूर,
चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर,
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा"
धन्यवाद
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro