Sant Shrestha Dnyaneshwar Maharaj Palkhi : दोन दिवसांच्या पुण्यातील मुक्कामानंतर बुधवारी (ता.१४) सकाळीच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने सासवडच्या दिशेनं प्रस्थान केलं.
Palkhi Update : दोन दिवसांच्या पुण्यातील मुक्कामानंतर बुधवारी (ता.१४) सकाळीच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने सासवडच्या दिशेनं प्रस्थान केलं.
दुपारी चार वाजता दिवेघाट विठ्ठलाच्या जयघोषणा दुमदुमून निघाला, खांद्यावर भगवी पतका, टाळ-मृदुंग सुमधुर नादात दिवेघाटाचा अवघा परिसर भक्तिमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
माऊलींची पालखी आज रात्री सासवड येथे मुक्कामासाठी पोहचणार आहे. सासवड येथे दोन दिवसांचा मुक्काम होणार आहे. आज पुण्यातील हडपसर भागातून प्रस्थान करत माऊलींच्या पालखीनं उरळी देवाची येथे विसावा घेतला.
पुढे वडकी नाका येथे विसावा घेतल्यानंतर दुपारी चार वाजता दिवेघाट चढाईला सुरुवात केली. विठ्ठलाच्या नामघोषात दंग झालेली हजारो वारकरी भक्तिरसात तल्लीन झालेली पाहायला मिळाली.
दरम्यान, २८ जून रोजी म्हणजेच आषाढी एकादशी दिवशी माऊलींची पालखी पंढरपूरला पोहचेल. यंदा आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या भेटीसाठी वारकरी वर्ग मोठ्या संख्येने वारीत सामील झाला आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro