Ticker

6/recent/ticker-posts

Animal Feed : खरीप हंगामासाठी एकदल चारा पिकांची लागवड



चांगल्या दुग्धोत्पादनासाठी गाई-म्हशींना सकस आणि आवश्यक अन्नघटकांनीयुक्त आहार देणे गरजेचे आहे जनावराच्या चाऱ्याचे वाळलेला चारा व हिरवा चारा असे दोन प्रकार असतात. परंतु कोणताही हिरवा चारा हा सकस असतोच असे नाही. ज्या हिरव्या चाऱ्याचे पोषणमूल्य जास्त असते, त्याला सकस हिरवा चारा म्हणतात.सकस हिरव्या चाऱ्यामध्ये एकदल व द्विदलवर्गीय चारापिके असतात.एकदल हिरव्या चाऱ्यामध्ये हत्ती गवत, मका, ज्वारी, बाजरी, कडवळ, गिनी गवत, धारवाड हायब्रीड याचा समावेश होतो. तर द्विदल चारा पिकांमध्ये लसून घास, चवळी, स्टायलो, दशरथ गवत याचा समावेश होतो.

जनावरांसाठी चारापिकांचे नियोजन

चा-यासाठी मका लागवड -
लागवडीसाठी सुपीक, कसदार व निचरायुक्त, मध्यम ते भारी जमीन या पिकाच्या वाढीसाठी आवश्यक आहे. लागवडीसाठी जमिनीची एक खोल नांगरट करून घ्यावी.एक नांगरट व २ ते ३ वेळा वखरणी करुन जमीन तयार करून पेरणीयोग्य पाऊस पडल्यास जून ते ऑगस्ट या कालावधीत पेरणी करावी.पेरणी साठी आफ्रीकन टॉल, मांजरी, कंपोझीट विजय, गंगासफेद डेक्कन हायब्रीड यापैकी वाणांची निवड करावी. पेरणीसाठी हेक्टरी ४०-४५ किलो बियाणे लागते. पेरणी ३० बाय ४५ सेंमी अंतरावर पाभरीने करावी. २०-२५ टन कंपोस्ट, नत्र ८० किलो, स्फुरद ४० किलो आणि पालाश ४० किलो द्यावे.जून ते ऑगस्ट या कालावधीत पेरणी करावी.पेरणी साठी आफ्रीकन टॉल, मांजरी, कंपोझीट विजय, गंगासफेद डेक्‍कन हायब्रीड यापैकी वाणांची निवड करावी.पेरणी साठी आफ्रीकन टॉल, मांजरी, कंपोझीट विजय, गंगासफेद डेक्‍कन हायब्रीड यापैकी वाणांची निवड करावी.
           

चाऱ्यासाठी ज्वारी लागवड -
ज्वारी हे उंच वाढणारे, पालेदार, रसाळ व सकस चारा देणारे पीक आहे. या चारापिकासाठी मध्यम ते भारी व चांगला निचरा होणारी जमीन लागते. पूर्वमशागतीच्या वेळी भरखत म्हणून शेणखत अथवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे.पेरणीपूर्वी दहा किलो बियाण्यास २५०  ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर जिवाणूसंवर्धक चोळावे. पेरणीच्या वेळी हेक्‍टरी ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ४०किलो पालाश द्यावे. पेरणीनंतर ३० दिवसांनी ५० किलो नत्र प्रति हेक्‍टरी द्यावे.हेक्‍टरी ४० किलो बियाणे लागते. पेरणी ३० सें.मी. अंतरावर करावी.पन्नास टक्के पीक फुलोऱ्यात असताना कापणी करावी.जून जुलै या कालावधीत पेरणी करावी. लागवडीसाठी रुची रा आर-४-११, मालदांडी ३५-१, निळवा, एमपी चारी, पुसा चारी, आय एस ४७७६, एएसजी १४, एमकेव्ही चारी या वाणांची निवड करावी.



चाऱ्यासाठी बाजरी लागवड -पेरणीपूर्वी एक खोलगट नांगरट व दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी.पेरणीपूर्वी जमिनीची मशागत करताना शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे.पेरणीच्या वेळी ३० किलो नत्र,३० किलो स्फुरद, ३० किलो पालाश द्यावे.पेरणीनंतर प्रति हेक्‍टरी एक महिन्याने ३० किलो नत्र द्यावे.पेरणीपूर्वी दहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर जिवाणूसंवर्धक चोळावे. लागवड करताना दोन ओळींतील अंतर ३० सें.मी. ठेवावे.पेरणीयोग्य पाऊस पडल्यास जून ते ऑगस्ट या कालावधीत पेरणी करावी. पेरणी साठी जाएन्ट बाजरा, जाएन्ट बाजरा गराजको यापैकी वाणांची निवड करावी.


गिनी गवत लागवड - भारी ते मध्यम, परंतु पाण्याचा योग्य निचरा होणाऱ्या जमिनीत उत्तम वाढते. गवताची लागवड सरी वरंब्यावर ९० × ६० सेंटीमीटर अंतरावर करावी. प्रति हेक्टर क्षेत्राकरिता १८ ते २० हजार कांड्या / बेणे पुरेसे आहे.बुंदेल गिनी- १ व २ आणि हरीथा यासारख्या अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची निवड करावी.लागवड करताना प्रति हेक्टरी १० ते १२ टन शेणखत लागवडीच्या वेळी द्यावे. प्रत्येक कापणी नंतर हेक्टरी २५ -३० किलो नत्र खताची मात्रा द्यावी.पहिली कापणी लागवडीनंतर २.५ महिन्यांनी आणि त्यानंतरच्या कापण्या ४० ते ४५ दिवसांच्या अंतराने कराव्यात.चारा पौष्टिक व रुचकर असून, यामध्ये ८ ते १० टक्के प्रथिने मिळतात.साधारणपणे वर्षाला एकरी ४० टन हिरवा चारा मिळतो. परंतु सुपीक जमिनीवर उत्पन्न दुपटीने येऊ शकते. गिनी गवत हिरवा चारा, वैरण व मुरघास तिन्हीसाठी उपयोगी आहे. गवत अतिशय रुचकर असून गुरांना ते मानवते व त्यांचे वजन वाढते.पीक पाणभरते असल्यामुळे ते भराभर वाढते म्हणून कीटकांपासून अगर कवकीय रोगांपासून पिकाला उपद्रव होत नाही.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या