कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी (ता. १०) विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला यश आले आहे.
Farmer Loan Waive नांदेड : कर्जमाफी योजनेपासून (Loan Waive Scheme) वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी शुक्रवारी (ता. १०) विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला यश आले आहे.
कर्जमाफी न मिळालेल्या नांदेड जिल्ह्यातील १ हजार ५८० शेतकऱ्यांना या योजनेचे लाभ देण्याचे आश्वासन सहकारमंत्री अतुल सावे यांनी दिले आहे.
आमदार अशोक चव्हाण, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार माधवराव जवळगावकर यांनी ही लक्षवेधी उपस्थित केली होती.
याबाबत बोलताना चव्हाण म्हणाले, की महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील विविध बँकांच्या एक हजार ५८० खातेदार शेतकऱ्यांना अद्यापही लाभ मिळालेला नाही.
त्यांच्या कर्जखात्यावरील रक्कम व शासनाकडून आलेली कर्जमाफीची रक्कम यांचा ताळमेळ न जुळल्याने त्यांना कर्जमाफी मिळू शकली नाही. या शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले असून, त्यांची एकूण कर्जमाफीची रक्कम २५ ते ३० कोटी रुपये आहे.
कुंडलवाडी (ता. बिलोली) येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेअंतर्गत असे ५३६ शेतकरी आहेत. रकमेचा ताळमेळ न जुळल्याने त्यांच्या कर्जमाफीसाठी आलेला ४.०९ कोटी रुपयांचा निधी शासनाकडे परत गेला आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro