कापसाचा कमाल भाव आता ८ हजार २०० रुपयांपेक्षा कमी मिळतोय. तर किमान भाव ७ हजार ५०० रुपयांवर आला.
Cotton Rate : देशातील बाजारात सध्या कापसाचे भाव हंगामातील निचांकी पातळीवर पोचले. यंदा शेतकऱ्यांनी चांगल्या दराच्या अपेक्षेने कापूस मागं ठेवला. एरवी डिसेंबर आणि जानेवारी या जास्त विक्रीच्या महिन्यात यंदा कापूस आवक (Cotton Arrival) मर्यादीत राहिली.
पण भाव दबावातच आले. मार्च महिन्यात शेतकरी पॅनिक सेलिंग करत असल्याचा फटका बसत असल्याचे जाणकारांनी सांगितले.
देशातील बाजारात मागील एक महिन्यापासून कापासचे दर कमी झाले आहेत. सध्या बाजारात कापसाची आवक वाढल्याने दरात नरमाई आली.
कापसाचा कमाल भाव आता ८ हजार २०० रुपयांपेक्षा कमी मिळतोय. तर किमान भाव ७ हजार ५०० रुपयांवर आला. बाजारातील आवकही मागीलकाही वर्षाच्या तुलनेत वाढलेली आहे. त्याचा दबाव कापसावर आला.
मागील वर्षापर्यंतचा विचार केला तर शेतकरी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कापसाची सर्वाधिक विक्री करत. जानेवारीपर्यंत शेतकरी ७० ते ८० टक्के कापूस विकत. पण यंदा जानेवारीपर्यंत ३० ते ४० टक्यांपर्यंतच कापूस विकला.
तर फेब्रुवारीपर्यंत केवळ ५० टक्केच कापूस बाजारात आला होता. शेतकरी यंदा कापसाची मर्यादीत विक्री करतील असं वाटतं होतं. कापसाचे भावही सरासरी ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते.
धन्यवाद
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro