Ticker

6/recent/ticker-posts

Maize Production : खानदेशात मका उत्पादन कमी होण्याचा अंदाज

Maize Production : खानदेशात मका उत्पादन कमी होण्याचा अंदाज
खानदेशात मक्याची आवक कमीच आहे. गारपीट, पावसाचा परिणाम पिकावर झाला असून, यंदा उत्पादनदेखील कमी येईल, अशी स्थिती आहे.
Maize Market Update जळगाव ः खानदेशात मक्याची आवक (Maize Arrival) कमीच आहे. गारपीट (Hailstorm), पावसाचा परिणाम पिकावर झाला असून, यंदा उत्पादनदेखील (Maize Production) कमी येईल, अशी स्थिती आहे.

मका पिकाची खानदेशात सुमारे ३५ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. लागवड मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे पाच हजार हेक्टरने वाढली. पण ती अपेक्षेपेक्षा कमी आहे.
यामुळे आवक कमी आहे. परंतु पीक आडवे झाल्याने पुढे उत्पादनदेखील कमी येईल, असे दिसत आहे. अनेक
 शेतकरी मक्याचे एकरी ३० ते ३५ क्विंटल उत्पादन साध्य करतात. तर किमान १८ ते २० क्विंटल एकरी उत्पादन अनेकांच्या हाती येते.

परंतु मका लागवडीसाठी प्रसिद्ध जळगावमधील चोपडा, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा भागांत वादळ व गारपिटीने पिकांची मोठी हानी झाली आहे.
पीक निसवले होते, त्यात दाणेही पक्व होत होते. पण अशातच पीक आडवे झाल्याने त्यात दाणे पक्व होणार नाहीत. कणसे मातीत गेल्याने त्यांची हानी वाढेल. उत्पादन अत्यल्पच येईल.

अनेकांनी आडवे झालेले पीक काढण्यास सुरवात केली आहे. कारण त्यात उत्पादन हाती येणार नाही. दुसरीकडे काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दूध उत्पादक, डेअरी फार्मचालकांना हिरवा चारा म्हणून त्याची विक्री केली आहे. क्षेत्र रिकामे करून त्यात पुढे इतर हंगामाचे नियोजन आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या