मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी पार पडलेल्या समृध्दी महामार्गावरील फलकांवरून मराठी भाषा गायब झाली आहे. हा महामार्ग महाराष्ट्राच्या दोन टोकाला एकत्र जोडणारा राज्यातील सर्वात मोठा आणि कमी वेळात अंतर पार करता येणारा एकमेव महामार्ग आहे. ज्यावर दिशादर्शक फलककासह गाव, जिल्हे दर्शविणाऱ्या फळकावरील नावांचे विद्रुपीकरण केल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीने केला आहे. शिवाय समृद्धी महामार्गाच्या नावाने विकास होतोय पण मराठी भाषेचा मात्र अपमान होत असल्याचा आरोप ही करण्यात आला आहे.
महाराष्ट्राअंतर्गत असलेल्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्यातील महामार्गालगत असलेली गाव, शहर, जिल्ह्यांच्या नावांचा इतिहास आणि शासकीय दस्तावेज बघितले असता, फलकावर लिहिण्यात आलेल्या गावांचा शोध लागला नाही. शिवाय महाराष्ट्राच्या नकाशावर सुद्धा सापडत नसून गावाचे नाव लिहिताना संपूर्णपणे विद्रूपीकरण केलेले आढळले आहे. पिंपळगाव चे पिंपलगँव करण्यात आले आहे.
याशिवाय करंजगाव चे करंजगँव नागपूर चे नागपुर, मुंबई चे मुम्बई असे लिहिण्यात आले आहे. अशा असंख्य चुका फलकावर करण्यात आल्याचे दिसून येत असून, राज्य शासनाने राज्याचा रस्ते विकास करतांना मराठी भाषेचे उल्लंघन होऊ नये याचीही खबरदारी घेण्याची मागणी केली आहे. शासनाच्या नियमानुसार प्रथम मराठी व द्वितीय इंग्रजी या नियमानुसार सर्वत्र लिखाण झाले पाहिजे, कोकणात होत असलेल्या महामार्गावर देखील तीच परिस्थिती पाहायला मिळत असून, उभारण्यात आलेल्या टोल नाक्यावरील सूचना देखील हिंदी आणि इंग्रजी मध्ये लिहिण्यात आल्या आहे. तर या मार्गावरील गावाच्या नावाचे विद्रुपीकरण झालेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रस्त्यांवरील फलकावर सर्वप्रथम मराठी भाषेला प्रथम स्थान द्यावं, गावाच्या नावाच विद्रुपीकरण थांबवावं, त्यामुळे समृध्दी महामार्गासह इतरही महामार्गावरील फलकांची दुरुस्ती त्वरित करावी अशी मागणी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केली आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏
0 टिप्पण्या
Thank You!
Have Nice day
-MAC+tech Agro