Ticker

6/recent/ticker-posts

Papaya Market : खानदेशात पपई दर स्थिरप्रतिकिलो सरासरी ९ ते १२ रुपये

Papaya Market : खानदेशात पपई दर स्थिर
प्रतिकिलो सरासरी ९ ते १२ रुपये
जळगाव ः खानदेशात पपई दर (Papaya rate) ९ ते १२ रुपये प्रतिकिलो व सरासरी १० रुपये असे स्थिर आहेत. आवक (Papaya arrival) कमी होत आहे. पण मागणी चांगली आहे.


उत्तर भारतात मागणी अधिक असून, तेथे पाठवणूक केली जात आहे.

सर्वाधिक आवक नंदुरबारमधील शहादा तालुक्यात होत आहे. त्यापाठोपाठ धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील चोपडा, जामनेर भागात पपईची आवक होत आहे.
या महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यात प्रतिदिन सरासरी ५० ट्रक (एक ट्रक १० टन क्षमता) पपईची आवक झाली आहे.

ही आवक फेब्रुवारीमधील आवकेच्या तुलनेत ३० ते ३५ टक्के कमी झाली आहे. फेब्रुवारीत प्रतिदिन सरासरी ६५ ट्रक पपईची आवक खानदेशात झाली होती. अनेक शेतकऱ्यांच्या पपईवर विषाणूजन्य रोग आले. यात नुकसान झाले.

दर्जेदार उत्पादन होत नसल्याने संबंधितांनी क्षेत्र रिकामे केले. यामुळे आवक कमी झाली आहे. परंतु योग्य व्यवस्थापन, नियोजन करून काही शेतकरी दर्जेदार उत्पादन घेत असून, संबंधित शेतकऱ्यांच्या शेतातून पपईची आवक बऱ्यापैकी आहे.

उष्णतादेखील या महिन्यात पाऊस, गारपिटीमुळे कमी राहिली आहे. यामुळे पपईचे पीक अनेक भागात सुस्थितीत दिसत आहे.


पपईची खरेदी धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, नंदुरबारमधील शहादा आदी भागांतील एजंट करीत आहेत.
उत्तरेकडे पंजाब, हरियाना, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आदी भागांत पपईची पाठवणूक सुरू आहे. मध्यंतरी पपई दरात काहीशी सुधारणा झाली होती. परंतु या महिन्यात सतत ढगाळ वातावरण, पाऊस व वादळाची समस्या राहीली. यामुळे दरात नरमाई आली.

पण दर कमाल १२ रुपये प्रतिकिलो, असे स्थिर आहेत. थेट जागेवर किंवा शिवार खरेदी केली जात आहे. काही प्रक्रिया उद्योजकदेखील पपईचा पुरवठा नंदुरबार, धुळे जिल्ह्यातून करून घेत आहेत. त्यासाठी कमी दर्जाच्या पपईचीदेखील खरेदी केली जात आहे.

धन्यवाद
🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या