Ticker

6/recent/ticker-posts

Agriculture Department : मुंबईत कृषी सहायकांच्या मागण्यांबाबत उपोषण

Agriculture Department : मुंबईत कृषी सहायकांच्या मागण्यांबाबत उपोषण
अकोला ः राज्यातील कृषी सहायकांच्या (Agriculture Assistant) मागण्यांबाबत शासनाकडून कुठलाही निर्णय न झाल्याने संघटनेच्या वतीने सोमवार (ता. ३०) पासून मुंबईत आझाद मैदानावर उपोषणाला (Fasting Protest) सुरुवात करण्यात आली आहे.
संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, कृषी आयुक्त व वरिष्ठांना आपल्या मागण्यांबाबत यापूर्वीच निवेदनाद्वारे अवगत केले. मागण्यांवर बैठकाही झाल्या.

परंतु कुठलाही ठोस निर्णय न झाल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी (ता. ३०) संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण सुरू केले.
कृषी सहायकांच्या नियतकालिक पदोन्नत्या बदल्या, पदोन्नतीतील अंशत: बदल, आंतरसंभागीय बदल्या, मुदतपूर्व निकडीच्या बदल्या यांना दिलेली स्थगिती उठवून त्या विहित नियमानुसार चालू ठेवाव्यात, यामुळे कृषी सहायक संवर्गावर वर्षानुवर्षे होणारा अन्याय थांबेल.
कृषी सेवक मानधनामध्ये ६००० वरून १६००० रुपये वाढ करण्याबाबत मुख्य सचिवांच्या बैठकीत मान्य झाले आहे यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळावी, कृषी सहायक संवर्गाची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असून ती भरावीत, कृषी सहायक संवर्गास मिळणाऱ्या कायम प्रवास भत्त्यामध्ये महागाई निर्देशांकानुसार वाढ करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी हे उपोषण सुरु झाले आहे. संघटनेचे राज्य सरचिटणीस शिवानंद आडे हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

धन्यवाद
🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या